उ:शाप

Submitted by मंदार-जोशी on 20 November, 2011 - 04:57

एका फसव्या क्षणी
क्रोधाचे गुलाम झालेल्या
माझ्या संमोहित शब्दांनी
तुझ्या नाजुक भावनांचा
वेध घेतला

अन्...

माझं निष्पाप प्रेम,
ते जादुई क्षण,
वचनं....शपथा,
हे सारं विसरून
तू लक्षात ठेवलेस
फक्त माझे अर्थहीन शब्द
अन् झिडकारून निघून गेलीस

तेव्हा पासून
अहिल्येसारखं
शिळेचं आयुष्य जगत
नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय

अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ?

गुलमोहर: 

छान Happy

व्यथा जाणवतेय कवितेतून
--------------------------------------------------------------------

शेवटच्या दोन ओळी नसत्या तर अधिक प्रभावी वाटली असती.
वैयक्तिक मत..... चुकलंही असेल कदाचित.

नसांनसांत भिनलेल्या
तुला जगवतोय>>> व्वा! तुला जगवतोय हे खरच सॉलिड आलंय!

शेवटच्या ओळी असल्या तरी काय? असो!

कविता टोन मेन्टेन करत आहे.

कल्पनाविलास फार आवडला.

-'बेफिकीर'!

भिडे काकांना १०००% अनुमोदन..
अप्रतिम जमली आहे, मलाही वाटलं की, शेवटच्या ओळी नसतील तर अधिक प्रभावी वाटेल..
Happy

मंदार, छानच जमली आहे. आवडली.

अहिल्येसारखा मलाही उ:शाप आहे
...की माझ्याही भाळी लिहीलंय
अश्वत्थाम्यासारखं वणवण भटकणं ? >> या ओळी विशेषच आवडल्या. तुझी कविता आणि तुझंच चॉइस, पण इथेच थांबला असतास तर खरंच जास्त प्रभावी वाटला असता शेवट.

मस्त कविता. हे तुझ्यासाठी. :)उत्तम कवितेबद्दल. अशाच अजून येऊदेत, म्हणून प्रोत्साहनात्मक बक्षीस. Proud

World Cup

कविता आवडली, पण शेवटच्या दोन ओळीत जरा गडबड आहे.
अहिल्या एकाजागी पडली होती, तर अश्वत्थामा भटकत होता.
अहिल्येला तिने अजाणतेपणी केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली तर अश्वत्थाम्याला जाणतेपणी केलेल्या अपराधाची शिक्षा मिळाली.

@ दिनेशदा, तुमचं अगदी बरोबर आहे.
चूक ती चूकच, मग जाणतेपणी घडली असो वा अजाणतेपणी. पण इथे भर शिक्षेच्या तीव्रतेवर आहे. मला वाटतं शिक्षा जरूर असावी, पण ती अश्वत्थाम्याला मिळालेल्या शिक्षेसारखी कायमची आणि जीवघेणी नव्हे. शिक्षेवर उ:शाप जरूर असावा.

अहिल्या एकाजागी पडली होती, तर अश्वत्थामा भटकत होता.>>> Lol दिनेशराव, यालाच टेंपरामेन्ट इन पोएट्री म्हणतात बहुधा! Happy

छानच.

बेफी, इथे महत्व उ:शाप असण्याला आहे. कोण कुठल्या अवस्थेत होतं, एके जागी होतं की वणवण फिरत होतं याला नाही.
त्यामुळे ही दोन उदाहरणे योग्यच आहेत.

Pages