एका लहान मुलीने मला तिच्या मैत्रिणींबरोबर समुद्रावर बोलावलं. अगदी पोचल्या दिवशीचीच गोष्ट. मी सगळा जामानिमा बरोबर घेतला. स्विमिंग सूट घातला, पाण्यापाशी जाईपर्यंत वरून घालण्यासाठी जवळपास शरारा वाटेल असा स्कर्ट चढवला, पंचे वगैरे गोळा केले... मग त्या मुलीचे आई-वडील शोधून तिला समुद्रावर नेत्ये असं सांगायचं आणि फटावळ पोहायला न्यायची असं ठरवलं होतं. आवरून मी खाली उतरले तेव्हा तिच्या आईनेच मला तिचा निरोप कळवला : “तू येईपर्यंत आम्ही पोहत जिथवर पोचलो असू तिथे येऊन भेट!” त्या मासळ्या कधीच पाण्यात उतरल्या होत्या.
एक पलंग, एक कपाट आणि एक बेसिन. एवढंच मावतं माझ्या इथल्या खोलीत. खोलीतली खिडकी इथली सगळ्यात मोठी गोष्ट आहे (हो, माझ्यापेक्षाही मोठी)! अंथरुणावर पडल्या पडल्या सप्तर्षी दिसतात. शुक्र आणि मंगळ असतात जवळपास. जितकं टक लावून बघावं तितक्या जास्त चांदण्या उमटत जातात रात्रभर. कुठेतरी आकाश पृथ्वीला मिळाल्यासारखं वाटतं तिथून समुद्र सुरू होतो, तो थेट माझ्या खोलीच्या पायथ्याशी येऊन थडकतो. त्यांचं आपापसात सगळं अगदी क्लिअर आहे -- आकाशाचा रंग तो आणि तोच समुद्राचा. ढग असताना पाण्यावर लाटा असतात आणि बोटी असताना वरच्या आरशात पक्षी उडतात. जगातले सगळे गजर बंद करून झोपता येतं रात्री.
मंडळी, आता हा लेख पूर्ण झाला आहे. अर्धवट लिखाणाला सुध्दा तुम्ही प्रतिसाद दिलात. त्यामुळे हुरुप आला. खूप खूप धन्यवाद. आत्ता फोटो टाकतानाही नंदनने तातडीने मदत केली त्याबद्दल त्याचे आभार.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.
----------------------------------------------------------------------------------------
सुमारे शंभर वर्षांपूर्वी तेंव्हाच्या यूरोपातील बरीचशी राष्ट्रे जर्मनीच्या विरोधात उभी राहिली होती. जर्मनी आणि ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्याच्या खाली युरोप चे अस्तित्व नष्ट होण्याची भीती त्यामागे होती. दोन महायुद्धे आणि चार पिढ्यांन्नतर ती राष्ट्रे आज पुन्हा एकदा एकत्र येत आहेत ती आर्थिक दृष्ट्या सर्वात बलवान झालेल्या त्याच जर्मनीला मदतीची साकडं मागण्यास . ह्यावेळेस यूरोपियन यूनियन चे अस्तित्व नष्ट होण्याची भीती त्यामागे आहे.
सप्टेंबर महिन्यात डाउ जोन्स इंडेक्स ने पाताळ धुन्डीत नविन मजली गाठल्या तर औक्टोबर महिन्यात परत वर उसळी मारुन नवीन उच्चांक गाठले. नोवेंबर महिन्याची सुरवात मात्र डाउ जोन्स इंडेक्स च नाही तर जग भरातील इंडेक्स साठी काही चांगली झाली नाही. युरोप मधे ग्रीस संबंधीत निर्णय घेणार्या सतरा लोकांच्या कमिटी ने आणि अमेरिकमधे कर्ज कपाती संबंधीत निर्णय घेणार्या बारा लोकांच्या कमिटी उठवलेल्या अनिश्चितते च्या धुक्या कडे पाहता वर्षाचे उरलेले दिवसही ही मार्केट्स अशीच वर खाली बागडणे सुरू ठेवतील असे दिसते !