कवित्व नाही माझा बाणा
मी नच असे थोर कवी तो
लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन्
समाज ज्यांना थोर मानतो
कधी न केली कसली ईर्षा
कुण्या कवीच्या काव्यत्वाची
तुम्ही नभीचे सुर्य तळपते
ना मज क्षमता काजव्याची
आवडले जे जेंव्हा जेंव्हा
शब्द सुमने उधळीत गेलो
काळोखाच्या साम्राज्यावर
मी शब्दांचा प्रकाश झालो
मनात ऊठले वादळ तेंव्हा
विचार माझे लिहिते झाले
ना मात्रांशी सोयर माझे
वृतांनी मज दूर लोटले
अनुभवले जगण्यातून जे जे
मनात सगळे मांडून घेतो
कधी मनाला भरती येते
अन् कागदावर सांडत जातो.
सत्तेच्या त्या खुर्चीसाठी
सगळेच कसे खेळ खेळतात
शेंडीवाले ब्राम्हणही आता
सुंथेवाल्याच्या पायी लोळतात
............................................................
तु निघुन गेल्यावर
नेहमिच असं घडणार
डोळे कोरडे ठेवतांना
मन मात्र रडणार
..............................................................
आठवतय मला अजून
झुल्यावर आपण झुललेलं
तुझ्या अधरावर होतं
प्रेमगीत खुललेलं
...............................................................
गावकुसाच्या वडाची
पाने असतात झडलेली
जशी गावातील माणसचं
म्हसणवाट्यात गाडलेली
शाळेत असतांना एक मुलगी मला चोरून बघायची
तिच्या अश्या बघण्याची मला सवय नसायाची
एकटं-दुकटं दिसलं कि हसायची कारण नसतांना
तिचं अस वागणं कळलं, आमच्या सार्या दोस्तांना
डब्यातील जेवनावरून ओळख आमची वाढली
एक दिवस तिनं मला चिठ्ठी एक धाडली
चिठ्ठींमधील शब्द होते भलतेच करारी
एका क्षणात मनाने घेतली आकाशात भरारी
दुसर्या दिवशी माझी शाळेची बस चुकली होती
सुन्या म्हणाला दिवसभर ती तुलाच शोधत बसली होती
परत शाळेत गेल्यावर ती उदास-उदास दिसली
मला नाही कळलं मैना का बरं रूसली?
खेळाच्या तासाला सर म्हणाले मैदानावर चला
गुपचुप तिच्या मैत्रिनिने मला एक निरोप दिला
नमस्कार मायबोलीकरांनो,
मी माझ्या चारोळ्या (असा मी तसा मी नावाखाली) या ठिकाणी वेगवेगळ्या भागात प्रकाशित करु इच्छितो. चारोळ्यांसाठी जो धागा आहे तेथे त्यास सुसुत्रता राहणार नाही. त्यासाठी हि सुट माघत आहे.
या चारोळ्या, माझ्या वेगवेगळ्या परिस्थितीजन्य मानसिक विचाराईची निर्मीती आहे. तेव्हा कृपया चुकांवर मार्गदर्शन अपेक्षित.....
तुला पावसात पाहिल्यावर
मन तुझ्यात हरपलं
तु ओळख विसरलीस अन्
ते डोळ्यातुन झिरपलं
....................................................................
मरण दाराशी आल तेव्हा
त्याला एक सांगायच होतं
माझ जगुन झालय आता
तिच्यासाठी जगायच होतं
तु जा म्हणशील
तर मी नक्की जानार आहे
तु म्हणुच नकोस
ती वाट सरणावर आहे.
घेण्याचं माहित नाही
देणं मात्र ठाऊक होतं
तुझ्यापुरतं मन माझं
नेहमीच भाऊक होतं.
वळवांचा पाऊस पाहून
तुझी आठवण आली
तु दुखावलेल्या भावनांची
डोळ्यांत गर्दी झाली.
कुण्या नाक्यावर एक कुत्र
प्राण जाऊन पडलं होतं
मांस त्याचं खाण्यासाठी
दुसरं कुत्र दडलं होतं.
सांजकाळी कातरवेळी
सांग अशी का बावरलीस?
मजविना जगण्याच्या
कल्पनेलाही घाबरलीस?
पोर्णीमेच्या रात्री तुला
गच्चीवरून पाहिली
माझ्या मनाची फुले तुला
त्या क्षणी वाहिली.
माझं तुझ्यावर प्रेम जडलं
यात काय गैर आहे?
तरी तुला तसं वाटलचं तर