असा मी तसा मी-१

Submitted by अविनाश खेडकर on 9 November, 2011 - 11:06

नमस्कार मायबोलीकरांनो,
मी माझ्या चारोळ्या (असा मी तसा मी नावाखाली) या ठिकाणी वेगवेगळ्या भागात प्रकाशित करु इच्छितो. चारोळ्यांसाठी जो धागा आहे तेथे त्यास सुसुत्रता राहणार नाही. त्यासाठी हि सुट माघत आहे.
या चारोळ्या, माझ्या वेगवेगळ्या परिस्थितीजन्य मानसिक विचाराईची निर्मीती आहे. तेव्हा कृपया चुकांवर मार्गदर्शन अपेक्षित.....

तुला पावसात पाहिल्यावर
मन तुझ्यात हरपलं
तु ओळख विसरलीस अन्
ते डोळ्यातुन झिरपलं
....................................................................

मरण दाराशी आल तेव्हा
त्याला एक सांगायच होतं
माझ जगुन झालय आता
तिच्यासाठी जगायच होतं
....................................................................

चुकुन माझा पाय एकदा
गरीबित घसरला
त्या दिवसापासुन समाज
माझ अस्तित्वच विसरला
.....................................................................

पोटातील कावळे आता
चांगलेच कळतात
इथली सर्व माणसं
त्यासाठीच तर पळतात
......................................................................

गावकुसाला एकांतच सारा
अन् तुझे केस वार्‍यावर
काळजाला कसतरी आवरलं
पण मन नव्हत थार्‍यावर
......................................................................

तु आलिस अन्
भाव स्पर्श बोलके झाले
तु गेल्यावर मात्र
शब्दही मुके झाले
......................................................................

कायद्याची पुस्तके आता
वकिलाच्या पोटासाठी
न्यायालयात न्याय झाला
लाल हिरव्या नोटांसाठी
.......................................................................

गुलमोहर: 
शब्दखुणा: