अविनाशच्या चारोळी -- भाग १

Submitted by अविनाश खेडकर on 8 November, 2011 - 03:09

तु जा म्हणशील
तर मी नक्की जानार आहे
तु म्हणुच नकोस
ती वाट सरणावर आहे.

घेण्याचं माहित नाही
देणं मात्र ठाऊक होतं
तुझ्यापुरतं मन माझं
नेहमीच भाऊक होतं.

वळवांचा पाऊस पाहून
तुझी आठवण आली
तु दुखावलेल्या भावनांची
डोळ्यांत गर्दी झाली.

कुण्या नाक्यावर एक कुत्र
प्राण जाऊन पडलं होतं
मांस त्याचं खाण्यासाठी
दुसरं कुत्र दडलं होतं.

सांजकाळी कातरवेळी
सांग अशी का बावरलीस?
मजविना जगण्याच्या
कल्पनेलाही घाबरलीस?

पोर्णीमेच्या रात्री तुला
गच्चीवरून पाहिली
माझ्या मनाची फुले तुला
त्या क्षणी वाहिली.

माझं तुझ्यावर प्रेम जडलं
यात काय गैर आहे?
तरी तुला तसं वाटलचं तर
ते गैर नाही तुझे प्रेमाशी वैर आहे.

जीवनात एक वेळ
मलाही प्रेम करायचय
तिच्या कोर्‍या काळजावर
माझ नाव कोरायचय

साहित्याच्या दुनियेत मी अगदिच नवखा आहे तोडक्या-मोडक्या रचनेमुळे कुनी कंटाळल्यास...........
क्षमस्व.......................

गुलमोहर: 
शब्दखुणा: