माय
मायनं अंथरूण धरलंय, शेवटच्या श्वासांची रांग संपत येत आहे...
धुगधुगी अजून आहे. मोठया कष्टाने तिने बाजूलाच बसलेल्या सवतीला खुणावले...
"काय पाहिजे...?" सवतीने विचारलं...
"माझ्या लेकराला...." शब्द घशात अडकून बसले जणू..
सवत तत्परतेनं म्हणाली, "हं, बोला ना, तुमच्या मुलाला काही त्रास होणार नाही, माझ्या सोताच्या लेकरावानी सांभाळल, जीवाला घोर नको लावून घेऊ माय... सुखाने जाय"
"माझ्या पोराला... कधी ढेकळाचा भात.... खाऊ घालू नको, .....आण त्येला कधी कोर्टाच्या आवारात... फिरकायला पण देऊ नको... माझी शपथ आहे तुला...." माय बोलली...