माबो ज्युनिअर शेफ्स - ३ - इझी केक पॉप्स फॉर मदर्स डे

Submitted by लाजो on 10 May, 2013 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

केक पॉप्स

येत्या रविवारी, १२ मे रोजी 'मदर्स डे' आहे. त्यानिमित्त लेकीच्या शाळेत 'मॅथ्स विथ मम' होते. नेमकी ऑफिसमधे माझी एक महत्वाची मिटींग Sad त्यामुळे जाता येणार नव्हते. लेक नाराज..... मग त्याची भरपाई म्हनून आणि तिला खुष करायला म्हणून हे केक पॉप्स केले Happy तिलाच मदतीला घेतले त्यामुळे बाई खुष Happy आणि वर्गातल्या मुलांना आणि मॅथ्स विथ मम ला आलेल्या आईकंपनींना मदर्स डे ची ट्रीट त्यामुळे ते ही खुष Happy

लहान मुलांना करायला अगदी सोपे आणि झटपट असे हे केक पॉप्स:

साहित्यः

- कुठलाही तयार प्लेन केक - मी बटर केक वापरला आहे
- कुकिंग चॉकलेट - व्हाईट / मिल्क / डार्क कुठलेही
- स्प्रिंकल्स, चॉकलेट शेविंग्ज, क्रश्ड नट्स, आयसिंग - आवडेल ते.
- बांबू स्क्युअर्स / पॉप स्टिक्स / आयस्क्रिम स्टिक्स
- जाड थर्माकोल / स्टायरोफोम चा तुकडा

क्रमवार पाककृती: 

१. एका बोल मधे तयार केकचे तुकडे करुन घ्या. मग हातानेच त्यांचा चुरा करा...हे करायला मुलांना मज्जा येते Happy

२. एकीकडे थोडे चॉकलेट मायक्रोवेव्ह / डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करुन घ्या.

३. थोडे मेल्टेड चॉकलेट केक च्या चुर्‍यात घाला आणि हाताने गोळा बनवा. चॉकलेट चे प्रमाण कमी जास्त लागेल तसे.

४. या गोळ्याचे लाडवासारखे छोटे गोळे करा आणि ट्रे मधे ठेऊन ट्रे फ्रिज मधे किमान २० मिनीटे ठेवा.

५. मधल्या वेळात स्क्युअर्स / पॉप स्टिक्स चे एक टोक उरलेल्या व्हाईट चॉकलेट मधे बुडवुन घ्या. स्प्रिंकल्स इ इ ची तयारी ठेवा.

६. आता थोडे चॉकलेट परत मेल्ट करा. फ्रिज मधेले थोडे पॉप्स बाहेर काढुन एका बाजुने त्यात तयार स्टिक्स तयार गोळ्याच्या मध्यापर्यंत घुसवा.

७. तयार पॉप मेल्टेड चॉकलेट मधे घोळा आणि लगेचच स्प्रिंकल्स इ इ त्यावर चिकटवा. मुलांना आवडते हे फार... पसारा होतो जरा पण त्यांची मजा बघायला आपल्यालाच मजा येते Happy
आयसिंग करणार असाल तर चॉकलेट कडक होईतो थांबा. मी फक्त स्प्रिंकल्स वापरले आहेत. नट्स शाळेत चालत नाहित.

८. तयार पॉप्स थर्माकोलमधे घुसवुन सुकायला ठेवा.

९. अश्याच पद्धतीने ५-६ च्या बॅचेस मधे सगळे पॉप्स बनवा. पूर्ण वाळू द्यात. मग हवे तर सेलोफेन मधे रॅप करा.

तर यंदाच्या मदर्स डे ला बच्चे कंपनी आणि बाबा कंपनींनी मिळून मस्त केक पॉप्स बनवुन आईला सर्प्राईज द्या Happy सोबत गिफ्ट द्यायला विसरू नका Wink

वाढणी/प्रमाण: 
एक खाऊन कुणी थांबेल का?
अधिक टिपा: 

१. हे पॉप्स अत्यंत सोप्पे आहेत करायला. उरलेला केक संपवायचा कसा? केक पॉप्स करा Lol
२. केक च्या चुर्‍यात चॉकलेट मिसळण्याऐवजी क्रिम चीज ही घालु शकता.
३. यात अनेक विविध डिझाईन्स करता येतिल... कल्पना शक्तीला भरपूर वाव.
४. चुरा करताना आणि स्प्रिंकल्स लावताना वगैरे जो पसारा होतो तो मुलांनीच साफ करायचा आहे... आईने नाही... मदर्स डे ट्रीट आहे, रिमेंबर?? Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रणाम मॅडम! हे केक पॉप्स आईपर्यंत पोचतील का ही शंकाच आहे पण....बच्चे कंपनीच फस्त नै करेल का? Lol

इथे ऊसगावात केक पॉपचा मोल्ड आणी बे.मिक्स,स्टिक्स असे किट मिळते.
तुझी आयडिया पण छान आणि सोपी आहे करायला..

लाजो, सहज कल्पना सुचली. केक्सचे क्यूब्ज करुन, त्यांच्या सहा बाजूंना वेगवेगळे डेकोरेशन करुनही छान दिसेल. फक्त ते ( थेट केक कापून केले तर ) आत स्क्यूअर्स खुपसण्याइतके मजबूत नसतील.

मस्त दिसतायत!
इथे केकपॉप मेकर मिळते. मस्त छोटे गोल केक तयार होतात. फक्त पॉपस्टिक्स टोचायच्या आणि डेकोरेट करायचे की झाले.

Hello

I have been reading the maayboli page for 10+ years. (when it used to be in minglish) Always in ROMA. Will have to practice typing in Marathi.
Lajo, your recipes are awesome! I have given them to my daughter. She really enjoyed making them. I have emaild her this recipe also. Wanted to give the credit to you. Hence writing for the first time Happy

धन्यवाद Happy

@प्राजक्ता आणि स्वाती<<< इथे ही मिळतात केकपॉप मोल्डस आणि केक पॉप मेकर. पण त्यासाठी आधी बॅटर बनवावे लागते, मग पॉप्स बेक करावे लागतात्...थंड होइतो वाट बघावी लागते Wink

मी हे पॉप्स रेडिमेड केक चे केले आहेत त्यामुळे आयत्यावेळेला, थोड्यावेळात, झट की पट करता आले Happy

@दिनेशदा, कुब्ज पण करता येतिल. हेच तयार मिश्रण चौकोनी मोल्ड मधुन काढायचे आणि मग पुढेची प्रोसिजर सेम.... पिरॅमिड शेप चे पण करता येतिल Happy

@ स्नेहल<<< थँक यु सो मच Happy छान वाटलं Happy