गर्भपात करणारी आई, ती वेडी बाई (़गर्भातल्या लहानग्या मुलीची खंत)...

Submitted by आठवणीतला मी.... on 28 February, 2012 - 06:55

{ आई आणि तिला गर्भपात करायला लावना-या त्या लोकांसाठी गर्भातील त्या लहान मुलीने हे तर म्हणले नसेल ना????}

प्रिय,
*
प्रिय मा़झ्या आईस हे माझं अखेरच पत्र,
ते डॉक्टरांचे कसले ग होते पोट तपासण्याचे यंत्र.
*
आई माझ्या येण्याची तुला लागली होती चाहुल,
मग का उचललेस सांग तु गर्भपाताचे हे पाऊल.
*
वाटलं नव्हंत मला तु अशी भेदशील,
़जन्माला येण्याआधिच माझ्या काळजात छेद करशील.
*
वाटलं नव्हंत मला तु एवढ्या लवकर सोड्शील,
दोघांमधली जुळलेली नाळ एवढ्या लवकर तोडशील.
*
त्या नराधम लोकांनी आणली तुझ्यावर गर्भपाताची वेळ,
तु नव्हता कारायला पाहिजे माझ्या जिवनाशी खेळ.
*
महिती होते देवाला तुम्हाला हवा वंशाचा दिवा,
पण त्या साठी माझ्या जिवनाशी खेळ कशाला हवा.
*
मुलीच नसतील जगात या सांगा म्हणावं काय करनार?,
तुमच्या होन-या मुलांचे लग्न कोणाशी करनार?.
*
ज्यानीं तुला हे करायला लावलं त्यांना तु प्रश्न कर,
मुलींशीच का लग्न केलं याचं घे तु उत्तर.
*
आई तुला आता फक्त एवढचं सांगते,
आई तुला आता फक्त एवढचं सांगते,
पुढचाही जन्म मी तुझ्याच पोटी मागते.

- अजित श्रीपती कोडितकर.
(दिनांक :- ०१-०१-२०१२, वेळ :- संध्या ६.१२)

गुलमोहर: 

माफ करा, पण कविता वाचण्याआधीच आगाऊपणाने एक प्रतिसाद देत आहे. मुलीला जन्मच न देणे या विषयावर तुंबळ काव्य झालेले आहे.

आता वाचून दिलेला प्रतिसादः

कविता बरीचशी गद्य टाईप वाटली. प्रामाणिकपणे लिहिल्यासारखीही वाटलीच. अधिक दर्जेदार काव्यलेखनासाठी शुभेच्छा

-'बेफिकीर'!

धन्यवाद प्रिती,
बेफिकीर मित्रा लिहीन्यासाठी शब्द पुरेसे नव्हते रे त्यासाठी ती गद्द्य टाईप वाटली असेल तुला. पण धन्यवाद. वाच जरुर एकदा.

मस्त