सुमल्याची आश्रम वारी!!... (२)
अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!"
"मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??"
"होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!! सगळ्यांचा एक झटक्यात झालेला एकमत बघून पारही अचंबित झालो!!