बहर

बहर

Submitted by Meghvalli on 23 February, 2026 - 02:44

पानापानांत हिरवा रंग बहरला,
सौंदर्यात तुझ्या आज वसंत बहरला।

पाहताच ती वसंतसेना हसली जरा,
आणि मनात माझ्या अनुराग बहरला।

शब्द जे साठले होते ओठांत माझ्या,
आता ग़ज़लांचा एक उत्सव बहरला।

स्वप्नजा होत्या कधी आकांक्षा माझ्या,
सत्यात त्यांचा कल्प वृक्ष बहरला।

मनाच्या वीणेवर सूर अलगद कोणी छेडले,
आणि हृदयात माझ्या अलवार यमन बहरला।

सोमवार, २३/२/३६ , १२:४० PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 

चंद्र जागला ग नभी..

Submitted by विकास सोहोनी on 17 October, 2019 - 05:16

चंद्र जागला गं नभी चंद्र जागला।
कोजागिरी रात्र आज चंद्र जागला ।।धृ.।।

शरदमास पूनवरात्र खेळ रंगला।
आज यौवनात रात्र खेळ रंगला।
नसांनसांत नि मनांत मोद जागला।।१।।

उद्याने आज सखे सजली ही किती।
तरुलतांसी बहर सखे आज हा किती।
आसमंती दरवळला गंध आगळा।।२।।

पूर्ण चंद्र माथ्यावरी लुप्त सावल्या।
लक्ष लक्ष तारका नभात दाटल्या।
कोजागिरी उत्सवात पियुष प्राशल्या।।३।।

रचना :- डॉ. विकास सोहोनी.

शब्दखुणा: 

केवळ

Submitted by vaiddya on 22 January, 2011 - 22:11

ही सारीच पाने आता विलगायची आहेत !

शाखे-शाखेतून कोवळे कोंब बिलगायचे आहेत ...

...

एक काठी !

...

एकच रेघ !

...

इथे असे ..

एक काठी होऊन जीवन

चालूच आहे ..

ते असे निष्पर्ण उरताना

आणि आतून रसरशीत जगत असताना

एक लक्षात येते ..

झाड होणार्‍याला केवळ एका काठीचे जगणे यायला हवे !

बहरांच्या आधीची केवळ एक निष्पर्ण काठी !

चित्र होणार्‍याने व्हायला हवे केवळ एक रेघ

अमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ !

आणि

कविता होणार्‍याने,

असायला हवे शब्द

गुलमोहर: 
Subscribe to RSS - बहर