रेघ

रेघ

Submitted by बेफ़िकीर on 20 March, 2015 - 11:35

नवर्‍याला बायको, बायकोला नवरा, पालकांना मुले, मुलांना पालक, शेजार्‍यांना पाजारी, मित्रांना मित्र, मैत्रिणींना मैत्रिणी, मित्रांना मैत्रिणी, मैत्रिणींना मित्र, भावाला भाऊ किंवा बहिण, बहिणीला बहिण किंवा भाऊ, माहेरच्यांना सासरचे, सासरच्यांना माहेरचे, शिक्षकांना विद्यार्थी, विद्यार्थ्यांना शिक्षक, साहेबाला सहाय्यक, सहाय्यकाला साहेब, समाजाला राजकारणी, नेत्यांना समाज, धर्मांना परधर्मीय, जातींना इतर जाती, पुरोगाम्यांना प्रतिगामी, डाव्यांना उजवे, जगणार्‍यांना मरणारे, मरणार्‍यांना जगणारे!

कोणालाच कोणीच पूर्णपणे कधीच आवडत नसते.

शब्दखुणा: 

केवळ

Submitted by vaiddya on 22 January, 2011 - 22:11

ही सारीच पाने आता विलगायची आहेत !

शाखे-शाखेतून कोवळे कोंब बिलगायचे आहेत ...

...

एक काठी !

...

एकच रेघ !

...

इथे असे ..

एक काठी होऊन जीवन

चालूच आहे ..

ते असे निष्पर्ण उरताना

आणि आतून रसरशीत जगत असताना

एक लक्षात येते ..

झाड होणार्‍याला केवळ एका काठीचे जगणे यायला हवे !

बहरांच्या आधीची केवळ एक निष्पर्ण काठी !

चित्र होणार्‍याने व्हायला हवे केवळ एक रेघ

अमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ !

आणि

कविता होणार्‍याने,

असायला हवे शब्द

गुलमोहर: 
Subscribe to RSS - रेघ