अंतराच्या कविता

तुझे बरोबरच होते सारे...

Submitted by सुमेधा आदवडे on 2 August, 2012 - 12:28

तुझे बरोबरच होते सारे...
मीच धरला होता हट्ट!
निसटुन गेले मन कधीतरी...
धरले होते जरी घट्ट...

तू म्हणाला होतास, "इतके रंग नको पसरवु.."
माझ्याच पोटी फुलपाखरे होती सतत!
उगाच पाहिले दिवसा तारे...तुझे बरोबरच होते सारे...

काचेचा तुकडा दिला होतास तू मला,
मीच जपलं त्याला उराशी, रत्न म्हणुन
त्याच टोकाने रक्ताळले मन बिचारे...तुझे बरोबरच होते सारे...

तू म्हणाला होतास,"इतका जीव नको लावुस, त्रास होईल!"
मी मारे म्हणाले," त्रास नसला तर ते प्रेम कसले?"
खरंच वेडी होते ना रे? तुझे बरोबरच होते सारे...

तुला आठवणींची अडचण होत होती...
मला मन आवरताना अजुनही त्या हाती लागतात.

निलेश बामणे

Submitted by निलेश बामणे on 24 June, 2012 - 02:57

पाऊस

पाऊस मला नको वाटतो
ती मज सोबत नसताना
पाऊस मला हवा वाटतो
तिज जवळ छत्री असताना

पाऊस मला नको वाटतो
रस्त्यावर चिखल नसताना
पाऊस मला हवा वाटतो
गरम चहा पित असताना

पाऊस मला नको वाटतो
मी आनंदी नसताना
पाऊस मला हवा वाटतो
ती दुःखातच असताना

पाऊस मला नको वाट
मुसळ्धार तो नसताना
पाऊस मला हवा वाटतो
अंगाला झोंबत असताना

पाऊस मला नको वाटतो
मज झोप येत नसताना
पाऊस मला हवा वाटतो
मज काव्य स्फुरत असताना

कवी- निलेश बामणे.

गुलमोहर: 

दोन फुले

Submitted by pradyumnasantu on 6 February, 2012 - 18:15

त्याची दोन मुले
जणू एका फांदीवरची दोन फुले
एक गर्द रंगाचे
तर दुसरे थोडे फीकेवाले
‍*
मुळांवर ’तिच्याकडून’ जे थेंब पडले
ते फांदीने फुलांना चोख धाडले
पण तिच्या माघारी
आईविना फुलांचे चेहरे सुकले
*
फांदीने काही न केले कमी
जे होते ते सर्व फुलांना दिले
कटु-गोड प्रसंगांत
त्यांना टवटवीत ठेवले
*
नोकरी, धंदा, कामानिमित्त,
मुलांची जागा दुरावली
एक इकडे, एक तिकडे
दूरदेशी स्थिरावली
*
फांदी विस्कटली
जणू मधूनच फासटली
जखम ’तिच्या’ वियोगाची
पुन्हा एकदा खरचटली
*
कितीतरी दिवसांनी
दुसरे फूल भेटीला आले
फांदी, फुलांची भेट झाली
फासटलेली फांदी पुन्हा सांधली
*
आता फांदीला जाणवल्या

गुलमोहर: 

तीन देवता

Submitted by pradyumnasantu on 15 December, 2011 - 19:54

तीन देवता

आपल्या गावातील देव्/देवता, व नदी सर्वांसाठीच श्रद्धास्थान असते, आणि तिसरे श्रद्धास्थान म्हणजे 'आई'. पहिल्या दोन देवतांहूनही आई का बरं श्रेष्ठ?

एक देवता वाहे
एक मंदीरी राहे
एक मम ह्रदयी वसते
तीन देवता, जणू दीप तेवता

वाहणारी गंगा
मंदिरात अंबा
हृदयातली माता
तीन देवता जणू दीप तेवता

एक पूर्ती
एक मूर्ती
एक साक्षात स्फूर्ती
तीन देवता जणू दीप तेवता

गुलमोहर: 

तुझ्या कवितेचा क्षण ..

Submitted by vaiddya on 4 January, 2011 - 04:15

तुझ्याबद्दल एखादी
मस्त कविता
करायला भाग पाडणारा,
तुझ्यावरच्या प्रेमाने अनिवार
ओथंबलेला,
अफाट प्रेमाने तुडुंब वाहणारा
असा प्रत्येक क्षण ..
तू समोर नसतानाच
का येतो ?

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अंतराच्या कविता