महाराष्ट्र मंडळ

बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: सप्टेंबर , २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 21 September, 2012 - 00:05

मंडळी नमस्कार!
दर वर्षी जसजसा सप्टेंबर महिना जवळ येत जातो तशी मला ’Come September’ या चित्रपटाची आठवण येते. १९६१ सालच्या या चित्रपटात रॉक हडसन हा इटली मधल्या आलिशान व्हिलाचा दरवर्षी सप्टेंबरमध्ये सु-ला येणारा मालक अचानक एक वर्षी जुलैमध्ये येतो. मालक येणारा महिना सोडला तर त्या व्हिलाची देखभाल करणाऱ्याने तिथे हॉटेल चालवलेले असते असे गमतीदार चित्रण त्या चित्रपटात होते. या चित्रपटाचे कथासूत्र नंतर १९६४ सालच्या कश्मिर की कली’ साठीही वापरले.

बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: ऑगस्ट , २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 21 September, 2012 - 00:03

मंडळी नमस्कार!
बघता बघता ऑगस्ट महिना उजाडला. माझ्या अध्यक्षपदाचे १ वर्ष संपले. ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणण्याऐवजी अर्धा भरलेला आहे असे मानणारा माझ्यातला आशावादी म्हणतो की अजून एक वर्ष बाकी आहे. या गतवर्षामधील एकंदरीत कामाचा आढावा घेतला तर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कामकाजात उत्तम प्रगती आहे. येत्या वर्षभरात त्यातील बऱ्याच नवीन उपक्रमांना मूर्त स्वरुप येईल.

बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: जुलै , २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 11 July, 2012 - 00:06

मंडळी नमस्कार,

नुकतीच (३०जून रोजी) आषाढी एकादशी झाली. ‘जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥’ असे म्हणत शेकडो वर्षे चालत आलेला वारकर्‍यांचा हा आनंद सोहोळा. ह्रुदयात वसणारा राम, आकर्षित करणारा किंवा रमविणारा कृष्ण आणि ऐक्य साधणारा परमात्मा स्वरूप विष्णु म्हणजेच हरी अशा अर्थाने अभिप्रेत असलेला वारकरी संप्रदायाचा महामंत्र जय जय राम कृष्ण हरी म्हणत हजारो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरात गेले असतील. या वारकर्‍यांचे आणि पंढरपूरातले व्यवस्थापन यांतून Event Management चे courses design करता येतील.

अधिवेशनामागचे चेहरे : श्री. बाळ महाले

Submitted by अजय on 9 July, 2012 - 09:00

बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक श्री बाळ महाले यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.

1) अधिवेशनामधे तुमचं कार्यक्षेत्र कुठलं आणि संयोजनात तुमची कुठली भूमिका आहे?
अधिवेशनात मुख्य निमंत्रक म्हणून माझी प्रमुख भूमिका म्हणजे अधिवेशनासाठी लागणाऱ्या संघटनेची उभारणी, वेगवेगळ्या समित्यांमधील समन्वय आणि जनसंपर्क. मला सांगायला खूप आनंद होतोय की आमची दोनशेहून अधिक उत्साही स्वयंसेवकांची संघटना तयार झाली आहे आणि ही संघटना दर महिन्याला वाढतेय.

BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३

Submitted by webmaster on 4 June, 2012 - 22:39
नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी !
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाबद्दलचं हितगुज.
(जुलै २०१३)

http://www.bmm2013.org

https://www.facebook.com/bmm2013

प्रांत/गाव: 

बृहन्महाराष्ट्र मंडळ- अध्यक्षीय: मे , २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 12 May, 2012 - 06:08

मंडळी नमस्कार,
नुकतीच, म्हणजे १ मे २०१२ रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५२ वर्षे पूर्ण झाली. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे या पंचकाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली संयुक्त महाराष्ट्राची, मराठी अस्मितेची चळवळ पंडित नेहरुंनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती देऊन सफल झाली. तो दिवस होता १ मे १९६०.

कोकणासाठी हवी जलवाहतूक

Submitted by Mandar Katre on 21 April, 2012 - 04:15

कोकणासाठी हवी जलवाहतूक

कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.

बृहन्महाराष्ट्र मंडळ- अध्यक्षीय: एप्रिल २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 12 April, 2012 - 21:00

मंडळी नमस्कार,

बृहन्महाराष्ट्र मंडळ- अध्यक्षीय: मार्च २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 19 March, 2012 - 12:29

मंडळी, नमस्कार!

कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बृ. म. मंडळ) विश्वस्त श्री. आनंद जोशी यांचे १७ फेब्रुवारी रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. श्री. आनंद यांच्या निकटवर्तीयांनी ती बातमी कळविली. क्षणभर खरंच वाटेना. आनंद जोशी आणि माझा परिचय हा गेल्या ५-६ वर्षांचा. पहिल्यांदा आमची ओळख झाली ती त्यांची मुलगी हेमांगी हिच्या माय मराठी प्रकल्पाच्या संदर्भात. २०११ च्या जुलै मधे मी बृ. म. मंडळ अध्यक्षपदावर निवडून आल्यावर मग आमचा नियमीत संपर्क होऊ लागला.

बृहन्महाराष्ट्र मंडळ- अध्यक्षीय: फेब्रुवारी, २०१२

Submitted by Ashish_Chaughule on 10 February, 2012 - 11:23

मंडळी, नमस्कार!

महाराष्ट्राच्या तीन आठवड्याच्या socio-economic-cultural भेटीनंतर १८ जानेवारीला अमेरिकेत परतलो. मनापासून सांगायचं तर इथले उद्योग, मित्रपरिवार, स्पोर्टस् हे नाही म्हटलं तरी आपलं विश्व झालेलं असतं आणि २ आठवड्यानंतर started missing it. नाही म्हणायला east coast वरची थंडी आणि snow मात्र महाराष्ट्रात miss केलं नाही.

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र मंडळ