तुझीच आठवण खूप येते
Submitted by अर्जुन ..✍️ on 27 July, 2026 - 05:24
गाण्याच्या सुरावटींमध्ये
तुझी आठवण खूप येते...
कवितांच्या शब्दांमध्ये
तुझंच नाव ऐकू येते.
पावसाची सर कोसळताना
तुझं रूप समोर येते,
मातीचा सुगंध दरवळताना
तुझी आठवण दाटून येते.
निळ्या आकाशाकडे पाहताना
तुझे ते लाजणे आठवते.
सागराच्या लाटांमध्येही
तुझ्या डोळ्यांतील ते प्रेम दिसते.
तुझी वाट पाहताना
वेळही थांबून जाते,
सर्वत्र शांतता असताना
तुझीच चाहूल लागते.
मंद मंद श्वासांमध्ये
तुझी आठवण गहिवरून येते...
माझ्यातला मी शोधताना
तुझीच आठवण खूप येते
विषय:
शब्दखुणा: