राधिका

Submitted by अर्जुन ..✍️ on 4 September, 2026 - 06:19

हिरव्यागार पठारावरती,
एक अनोखी चाहूल लागली,
एका घनदाट वृक्षाखाली,
एक तरुणी नजरेस पडली.

देखणे ते रूप साजिरे,
कोमल तिची ही काया,
माझ्या मनात फुललेली,
साकार झाली तीच माया.

काळ्याभोर केसांची बट,
गालावर तिच्या रेंगाळली,
माझी नजर नकळत मग,
तिच्याच रूपावर खिळली.

मृगनयनी ती अप्सरा जणू,
या भूतलावर अवतरली,
हाती घेऊन रानफुले,
हळूच माझ्या समीप आली.

क्षणभर ती तिथे थांबली,
आणि गालात हळूच हसली,
“मी राधिका...” पुटपुटून,
दुसऱ्या वाटेने निघून गेली.

रानफुले ठेवुनी ओंजळीत,
ती अनोळखी वाट धरून गेली,
निसर्गाच्या कुशीत विरून जाताना,
माझे मनही सोबत घेऊन गेली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users