Submitted by अर्जुन ..✍️ on 27 July, 2026 - 05:24
गाण्याच्या सुरावटींमध्ये
तुझी आठवण खूप येते...
कवितांच्या शब्दांमध्ये
तुझंच नाव ऐकू येते.
पावसाची सर कोसळताना
तुझं रूप समोर येते,
मातीचा सुगंध दरवळताना
तुझी आठवण दाटून येते.
निळ्या आकाशाकडे पाहताना
तुझे ते लाजणे आठवते.
सागराच्या लाटांमध्येही
तुझ्या डोळ्यांतील ते प्रेम दिसते.
तुझी वाट पाहताना
वेळही थांबून जाते,
सर्वत्र शांतता असताना
तुझीच चाहूल लागते.
मंद मंद श्वासांमध्ये
तुझी आठवण गहिवरून येते...
माझ्यातला मी शोधताना
तुझीच आठवण खूप येते
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान प्रेमकविता..!
छान प्रेमकविता..!
छान
छान
अजय आणि रुपाली - अभिप्राय
अजय आणि रुपाली - अभिप्राय दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
फार भारी शब्दरचना वगैरे नसली
फार भारी शब्दरचना वगैरे नसली तरी साधी सरळ , उत्कट प्रेम भावना फार तरलपणे व्यक्त झाली आहे.
त्यातील सच्चेपणामुळे कविता आवडली.
स्वानंदी, कवितेवरील तुमच्या
स्वानंदी, कवितेवरील तुमच्या सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.