“ सगळी तयारी झाली आहे देवाधिदेवा” - सुकेतू.
“पुढच्या कित्येक पिढ्यांचे, कोट्यवधी लोकांचे भविष्य या मुहूर्तावर अवलंबून आहे.” - विष्णू
“मी सगळे मॉडेल्स चेक केले आहेत. सगळे सिम्युलेशन्स चालवून पाहिले आहेत.”
“ त्या संयंत्रावर काही द्रवाचे थेंब पडताच तो सक्रिय होईल आणि जनुकांना संकेत मिळणे सुरु होईल.” - विष्णू
सुकेतुने मॉनिटरकडे लक्ष वेधले. 28-30 ठिपके टेकडी चढत होते.
“ देवा .. ! आता ? इथे द्रवाची आवश्यकता आहे … “, सुकेतू.
“ काहीतरी मार्ग निघेलच“ - विष्णू.
अरे माझ्या पोटा, मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील. दिवसेंदिवस तू वाढतच चाललायस.
केवळ तुझ्यासाठी मी माझे मन मारून डाएट करतो. फक्त ऑफिसच्या पार्ट्या, स्वयंपाकवालीच्या दांड्या, औटींग, वाढदिवस, सण, उत्सव, वीकेंड यावेळा सोडून. पण इतरवेळी मात्र मी चार चपात्या आणि दोन वाट्या भात यापेक्षा एक घासही जास्त खात नाही.
हां, आता आठवड्यातून दोनदा फ्राईड चिकन खातो, पण ते केवळ प्रोटीन ची गरज पूर्ण व्हावी म्हणूनच ना.
अरे तुझ्यासाठी मी रोज व्यायाम करतो, फक्त ज्या दिवशी करत नाही ते दिवस सोडून.
हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?”
स्थापना केली तेव्ह्ढं ठीक पण या स्पर्धा नि उपक्रमांची रेलचेल?....अबब... रिकामटेकडा वाटलो होय मी? कुठे कुठे पुरा पडू ? अमकी स्पर्धा तमका उपक्रम, प्रकाश चित्रांचे धागे, चिमुरड्यांची चित्रं........... शिवाय प्रायमरी रिस्पोन्सिबिलिटिज तर आहेतच.... प्रार्थना-गार्हाणी ऐका, त्याला प्रतिसाद द्या, संकटं पळवा, आरत्या, प्रसाद स्वीकारा, दर्शन द्या.....हुश्श.....दमलो बुवा.....
पण तरीही एक डोळा मायबोलीवर असतोच. आवडतं मला तिथे बागडायला या दिवसांत, काय वाचू, काय पाहू असं होऊन जातं ...