Submitted by शेखर काळे on 7 September, 2025 - 02:21
“ सगळी तयारी झाली आहे देवाधिदेवा” - सुकेतू.
“पुढच्या कित्येक पिढ्यांचे, कोट्यवधी लोकांचे भविष्य या मुहूर्तावर अवलंबून आहे.” - विष्णू
“मी सगळे मॉडेल्स चेक केले आहेत. सगळे सिम्युलेशन्स चालवून पाहिले आहेत.”
“ त्या संयंत्रावर काही द्रवाचे थेंब पडताच तो सक्रिय होईल आणि जनुकांना संकेत मिळणे सुरु होईल.” - विष्णू
सुकेतुने मॉनिटरकडे लक्ष वेधले. 28-30 ठिपके टेकडी चढत होते.
“ देवा .. ! आता ? इथे द्रवाची आवश्यकता आहे … “, सुकेतू.
“ काहीतरी मार्ग निघेलच“ - विष्णू.
“ बघा देवा तुम्ही केलेल्या कार्याचे फळ, ‘ त्या’ ने मार्ग शोधून काढलाच. महादेवाचा अंश आहे तो” - देवी
सर्वांनी एकच जल्लोष केला ..
—-----
त्याच वेळी, तरुण शिवाजीराजे भोसले, आपल्या कट्यारीने करंगळी चिरून, रक्ताची धार रायरेश्वराच्या शिवलिंगावर धरत होते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा