शशक २ - आधी पोटोबा - माबो वाचक

Submitted by माबो वाचक on 4 September, 2025 - 01:45

अरे माझ्या पोटा, मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील. दिवसेंदिवस तू वाढतच चाललायस.
केवळ तुझ्यासाठी मी माझे मन मारून डाएट करतो. फक्त ऑफिसच्या पार्ट्या, स्वयंपाकवालीच्या दांड्या, औटींग, वाढदिवस, सण, उत्सव, वीकेंड यावेळा सोडून. पण इतरवेळी मात्र मी चार चपात्या आणि दोन वाट्या भात यापेक्षा एक घासही जास्त खात नाही.
हां, आता आठवड्यातून दोनदा फ्राईड चिकन खातो, पण ते केवळ प्रोटीन ची गरज पूर्ण व्हावी म्हणूनच ना.
अरे तुझ्यासाठी मी रोज व्यायाम करतो, फक्त ज्या दिवशी करत नाही ते दिवस सोडून.
एवढे करून सुद्धा दर महिन्याला मला पॅन्ट चा घेर वाढवावा लागतोय. बघ रे बाबा, जरा कमी व्हायचं मनावर घे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol