भटकंती कोराईगडाची

Submitted by जिप्सी on 5 December, 2010 - 11:06

बर्‍याच दिवसांपासुन ऑफिसच्या मित्रांबरोबर कुठे Weekend Outingला गेलो नव्हतो (आमच्या Weekend Outing मध्ये बाईकवरून ट्रेकिंग, समुद्रकिनारे, रीसॉर्ट, वॉटरफॉल्स इ. सगळेच असते (थोडक्यात काय तर बाईकवरून मस्त भटकायचे) ;-)). त्यामुळे आता कुठेतरी जायचेच असे सर्वानुमते ठरले आणि एक Warm Up ट्रेक म्हणुन कोराईगडाची निवड झाली :-). आणि आम्ही ७ जण ४ बाईकवर कोराईगडाच्या भटकंतीला निघालो. खरंतर हा गड ट्रेकिंगसाठी नाहीच आहे. पायर्‍यांच्या मार्गे तुम्ही २०-२५ मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहचू शकतात (पेठ शहापूर मार्गे). गडाच्या माथ्यावर तसं पाहण्यासारखं जास्त काही नाही, पण गडाची १.५ ते २ किमीची तटबंदी अजुनही शाबुत आहे आणि त्या तटबंदीवरून चालायला धम्माल येते. :-). कोराईगड म्हणजे एक पठार असुन संपूर्ण गडावर फिरण्यास दोन तासाचा अवधी पुरेसा आहे. गडावर दोन मंदिरे असुन त्यातील एक मंदिर हे गडाची अधिष्ठात्री देवी "कोराईदेवीचे" आहे (कोराई देवी कधी काळी अलंकारानी भरलेली असायाची. इंग्रजांच्या लढाईनंतरच्या काळात या देवीचे सारे दाग-दागिने लुटुन नेण्यात आले. आजच्या घडीला हे दागिने मुंबईच्या 'मुंबादेवी' च्या अंगावर आहेत -संदर्भ-प्र. के. घाणेकर - साद सह्याद्रिची). देवळाच्या समोरच दीपमाळ आहे. दुसरे हे महादेवाचे छोटेसे पण सुंदर मंदिर आहे. गडावर दोन विस्तीर्ण तळी असुन त्याचे पाणी पिण्याजोगे नाही. गडावर एकुण सहा तोफा आढळतात व त्यातील सर्वात मोठी तोफेचे नाव "लक्ष्मी" तोफ असे आहे. कोराईगडावरून खाली पसरलेल्या अ‍ॅम्बी व्हॅलीचे (सहारा सिटी) विहंगम दृष्य बघता येते. या अ‍ॅम्बी व्हॅलीचा वळसा आता कोराईगडाच्या चारही बाजुने येऊ लागला आहे :-(.

शिवकाळापासुन कोरबारस मावळाच्या रक्षणाची जबाबदारी असलेला हा "कोराईगड" लोणावळ्यापासुन अंदाजे २०-२५ किमी अंतरावर अ‍ॅम्बी व्हॅलीच्या (सहारा सिटी) दिशेने आहे. वाटेत भुशी डॅम, टायगर पॉईंट इ. "पिकनिक पॉइण्ट्स" लागतात.

आमच्या वृतांतात जास्त काही सांगण्यासारखे नाही पण, एक गंम्मत मात्र आवर्जुन सांगावी वाटते ती अशी कि, आम्ही सगळे मिळुन ७ जण आणि ४ बाईक्स होत्या, त्यातल्या एका मित्राच्या (प्रसाद) मागे कुणीच बसले नव्हते. खोपोलीच्या आधी जवळपास ५-६ किमी एका अंतरावर आमचा तो मित्र थांबला आणि त्याने एका ८-९ वर्षाच्या मुलाला खोपोलीपर्यंत लिफ्ट देण्यासाठी बाईकच्या मागे बसवले. मी आणि माझा मित्र (प्रशांत) तो का थांबला हे पाहण्यासाठी पुढे त्याची वाट पाहतो उभे राहिलो. तितक्यात आमच्यासमोरून त्याची बाईक गेली आणि आम्ही दोघांनी त्याला हात करून पुढे जाण्यास सांगितले. काही वेळानंतर पुढे प्रसाद परत थांबलेला दिसला आणि त्याच्या मागे तो लहान मुलगा नव्हता. कुतुहुलाने आम्ही त्याला विचारले असता प्रसाद म्हणाला, " अरे, जेंव्हा तुमच्या समोरून आमची बाईक गेली तेंव्हा त्या मुलाने लगेच ओरडुन आणि गाडीचे ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करून गाडी थांबवण्यास सांगितले आणि विचारले असता तो लहान मुलगा म्हणाला, "तुम्ही मला किडनॅप करत आहात!!!!!, तुमच्या दोन्ही मित्रांनी तुम्हाला हात दाखवून खुणावलेले मी पाहिले. मला नाही जायचे तुमच्याबरोबर." असे बोलुन तो बाईकवरून उतरून पळाला. Proud आम्ही मात्र एकमेकांची तोंड बघत, "भलाई का जमाना हि नही रहा" असे म्हणत मार्गक्रमण करू लागलो. (पण मनातुन मात्र त्या लहानमुलाचे कौतुकच करत होतो.:-))

चला मी आता भरपूर बोललो, आता पुढचा सगळा वृतांत माझे फोटो बोलतील. Happy

=================================================
=================================================
प्रचि १
पायथ्यापासुन दिसणारा कोराईगड आणि तटबंदी

प्रचि २

प्रचि ३
पायर्‍यांची वाट

प्रचि ४
गणेश मंदिर आणि गुहा

प्रचि ५
गणेश दरवाजा

प्रचि ६
गणेशदरवाजा (मागील बाजुने)

प्रचि ७
सफेद घराजवळच आमच्या बाईक्स पार्क केल्या

प्रचि ८
गडावरून दिसणारे "पेठ शहापूर" गाव

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
कोराईदेवी

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
लक्ष्मी तोफ
कोराईगडावरून दिसणारे अ‍ॅम्बी व्हॅली (सहारा सिटी)चे विहंगम दृष्य
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
आमचेही फोटोसेशन Happy
प्रचि ३१

गुलमोहर: 

फार धमाल करता बुवा तुम्ही..... Happy
अँबी व्हॅलीचं चित्र मस्त आलंय.... सर्वच प्रचि अप्रतिम आहेत...कोराईदेवी,लक्ष्मी तोफ..फार छान

त्या हुशार मुलाचा फोटो उगाचच असेल असं वाटलं... असो... Happy .

गुणेश, डॉक, शैलजा धन्यवाद!!! Happy
त्या हुशार मुलाचा फोटो उगाचच असेल असं वाटलं...>>>>>डॉक, तो फोटो काढायच्या आधीच धूम्म पळाला Happy

"भलाई का जमाना हि नही रहा" असे म्हणत मार्गक्रमण करू लागलो. >> Lol

मस्त फोटोज.. ११ वा खासच ! Happy
बाकी कोरीगड म्हटले की फक्त सहारा एम्बेव्हॅलीचेच फोटोच जास्त दिसतात.. पण तुम्ही मात्र कोरीगडला जास्त महत्त्व दिलेत.. ते आवडले ! Happy

यो, पराग, दा, सावली प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

प्रचि १९ मध्ये आहे तो "आंबवणे" (आंबवणे गावातुन येणारा) दरवाजा. इकडुन येणारी वाट थोडीशी अवघड आहे. कधीतरी या दरवाज्याने कोराईगड सर करायचा आहे. Wink Happy

किसनॅप वाला किस्सा मस्तच... Happy
फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर...
लोणावळा स्टेशनपासुन गडापर्यंत जायला वाहने असतात का?

लोणावळा स्टेशनपासुन गडापर्यंत जायला वाहने असतात का?>>>लोणावळा एस्.टी. स्टॅण्डवरून सहारा सिटी, आंबावणे गाव, भांबूर्डे येथे जाणार्‍या गाड्या (लाल डब्बा) भरपूर आहेत. काहि प्रायव्हेट गाड्यापण जातात. Happy

>>> शिवकाळापासुन कोरबारस मावळाच्या रक्षणाची जबाबदारी असलेला हा "कोराईगड" ....
आता अ‍ॅम्बी व्हॅलीचे रक्षण करतो .....

प्रचि ११ ची फ्रेम सुंदर आहे,
प्रची २२ मधे जो जलाशय दिसतोय तो मानवनिर्मीत आहे, तीथेच येक मॅनेमेड बिच, वेव पुल आहे आणि बाकीचे वॉटर स्पोर्ट्स आहेत, तसेच त्या जलाशयावर जो पुल दिस्तओत त्याचा वापर लेसर शो चा स्क्रीन म्हणुन ही होतो.
प्रची २५ मधे दिसतायत ते AUSSIE TIMBER CHALETS

अ‍ॅम्बी व्हॅली ते गड असा रोप वे ही आहे पण तो बंद आहे.

११, २८ - आवडले.

किडनॅप-किस्सा भारीच Lol

आता अ‍ॅम्बी व्हॅलीचे रक्षण करतो .....>>>>अगदी, अगदी Sad Sad

पाटील, अधिक माहितीबद्दल धन्यवाद :-).
रात्रीच्या वेळेस गडावरून अ‍ॅम्बी व्हॅलीचे दृष्य मस्त दिसत असेल ना. Happy
अ‍ॅम्बी व्हॅली ते गड असा रोप वे ही आहे पण तो बंद आहे.>>>>हि माहिती नविन Happy

प्रचि १९ मध्ये आहे तो "आंबवणे" (आंबवणे गावातुन येणारा) दरवाजा. इकडुन येणारी वाट थोडीशी अवघड आहे >>>>> अरे ती वाट आता चांगलीच मोडली आहे. आंबवणे दरवाजातून खाली उतरले की बरीच वाट ढासळली आहे. मी ४ वर्षा पुर्वी प्रयत्न केला होता पण पुढे वाट सापडली नाही व परत यावे लागले.

अरे ती वाट आता चांगलीच मोडली आहे. आंबवणे दरवाजातून खाली उतरले की बरीच वाट ढासळली आहे. मी ४ वर्षा पुर्वी प्रयत्न केला होता पण पुढे वाट सापडली नाही व परत यावे लागले.>>>>>>ओह्ह!, धन्स मनोज अधिक माहितीकरीता. Happy

अप्रतिम फोटो, किडनॅप वृत्तांत Lol
कोराईगड म्हटले की कॉलेजातली भटकंती आणि शिवरायांच्या इतिहासावर झडलेल्या चर्चेच्या फेर्‍या आठवल्या.
ते अँबे व्हॅली पाहून उगाच कसेचेच झाले, असो.

सुंदर.