विविधभारती

जुन्या विविध भारती वरील या धून कोणाला आठवतात का?

Submitted by पशुपत on 28 August, 2026 - 05:23

माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणात, अभ्यास करताना सततचा मित्र म्हणजे आकाशवाणी पुणे वरचे विविध भारती !
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी , विविध विषयांवरचे विविध मनोवृत्तीला साद घालणारे , विविध गाणी घेऊन सतत गुंजत राहणारी विविध भारती! तुमच्या जीवनात चैतन्य देत राहणारी, अभ्यास करताना चित्त एकाग्र करण्यास मदत करणारी विविध भारती आणि त्यावरील प्रसारित होणारी गाणी.
वा काय छान दिवस होते !

स्मरणरंजन : रेडियो

Submitted by Mandar Katre on 3 August, 2022 - 01:15
रेडियो

ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल...

बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं.

या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती...

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विविधभारती