स्मरणरंजन : रेडियो

Submitted by Mandar Katre on 3 August, 2022 - 01:15
रेडियो

ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल...

बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं.

या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती...

बाबांना नाट्यसंगीत खूप आवडायचं... त्यांच्यामुळे माझीही सगळी नाट्यगीते तोंडपाठ... रात्रीच्या अंधारात झोपता झोपता बेला के फूल कार्यक्रम लागायचा... त्यातली जुनी हिंदी गाणी एका निराळ्याच विश्वात आमच्या बालमनाला घेऊन जायची...

पुढे कॉलेज ला असताना एफेम रेडियो शी ओळख झाली. रत्नागिरी जवळ एफेम स्टेशन नसलं तरी बऱ्याच वेळा त्यातल्या त्यात उंच जागी मुंबई, पणजी, पुणे चे सिग्नल यायचे. पावसाळ्या अगोदर एप्रिल मे मध्ये तर चक्क पाकिस्तान, अरब कन्ट्री आणि केरळ तामिळनाडू चेही एफेम सिग्नल घरामागच्या डोंगरावर गेलो तर ऐकू यायचे...

रेडियोवर क्रिकेट कॉमेन्ट्री ऐकणे हा तर जिव्हाळ्याचा विषय... 1992, 1996 च्या वर्ल्ड कप च्या वेळी रेडियो कॉलेजसाठी प्रवास करताना सतत उपयोगी पडे...

झूमरी तलय्या या गावाबद्दल एक जबरदस्त अनामिक आकर्षण वजा कुतूहल विविधभारती मुळे त्यावेळी निर्माण झालेले... कारण फर्माईश कार्यक्रमात बरीचशी पत्रे झुमरी तलय्या वरूनच यायची. उर्दू सर्व्हिस वर फर्माईश कार्यक्रमात अनेक पत्रे सीमापार पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चीं असायची...

1989 साली आकाशवाणी ने विज्ञान प्रसारासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून "विज्ञान दृष्टी " नावाची स्पर्धात्मक सीरीज प्रसारित केली. या स्पर्धेत देशातील 150 ब्राईट स्टुडन्ट निवडण्यात आले, त्यात मी एक होतो, हे सांगताना अभिमान वाटतो!

विदेशात असतानाही रात्री आवर्जून विविध भारती नेट वरून ऐकत असायचो... असा हा आमचा रेडियो सोबतचा प्रवास... या आठवणी सदैव सोबत राहतील...!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. रेडिओच्या खूप आठवणी आहेत. अगदी जुन्याकाळापासूनच्या. तारेच्या ग्रिडची पट्टी असायची अँटेना म्हणून. त्या रेडिओचा ' मार्कोनी' हा ब्रँड होता. तो बऱ्याच काळापासून अडगळीत पडला होता. एक दिवस एक चुलत भाऊ घरी आला. तो शिकत होता. त्याने हौस म्हणून काहीतरी खाट खुट करून तो चालू केला. आणि इतक्या वर्षांनी तो चालू झाला! तोपर्यंत व्हॉल्व जाऊन ट्रांसिस्टर्स आले होते. पण मजा म्हणून आम्ही तो लावायचो.
बऱ्याच नंतर कळले की मार्कोनी हे एक नोबेल लॉरीएट शास्त्रज्ञ आणि उद्योजक होते, आणि आवाजाच्या दूरसंक्रमणासाठी (प्रक्षेपण?) त्यांनी रेडिओ लहरींचा वापर करून बिनतारी तारायंत्राची निर्मिती शक्य केली होती, मार्कोनी ब्रँड हा खूप मोठा ब्रँड होता वगैरे. थोडासा अभिमानही वाटला होता तो रेडिओ घरी असल्याबद्दल. कदाचित म्हणूनच तो भंगारात काढला गेला नसावा त्या काळी.

पावसाळ्या अगोदर एप्रिल मे मध्ये तर चक्क पाकिस्तान, अरब कन्ट्री आणि केरळ तामिळनाडू चेही एफेम सिग्नल घरामागच्या डोंगरावर गेलो तर ऐकू यायचे...
FM लहरी एवढ्या दूर प्रवास करू शकतात??? कारण radio waves ची frequency वाढवली की travelling distance कमी होतो. kHz (Medium wave radio, आत्ताची अस्मिता वाहिनी) पेक्षा MHz (FM radio) कमी अंतर जातात, GHz (WiFi / Bluetooth) तर त्याहून कमी अंतर जातात.

सध्याच्या नवीन फोन्स मध्ये FM radio नसतो हे पाहून खूप वाईट वाटते. आता नवीन फोन घ्यायचा विचार आहे परंतु पक्का FM प्रेमी असल्याने असे फोन बाद करावे लागतात!

Propogation हा एक phenomenon FM skywave संदर्भात महत्वाचा असतो. विशिष्ट tropospheric conditions ज्या मोसमी वार्यामुळे एप्रिल मे महिन्यात कोकणातील वेस्टर्न कोस्टल एरियामध्ये बनतात ज्यायोगे fm सिग्नल खूप दूर पर्यंत travel करू शकतात..

विकिपीडिया : Tropospheric ducting
Edit
Main article: Tropospheric ducting
Sudden changes in the atmosphere's vertical moisture content and temperature profiles can on random occasions make UHF, VHF and microwave signals propagate hundreds of kilometers (miles) up to about 2,000 kilometers (1,200 miles)—and for ducting mode even farther—beyond the normal radio-horizon. The inversion layer is mostly observed over high pressure regions, but there are several tropospheric weather conditions which create these randomly occurring propagation modes. Inversion layer's altitude for non-ducting is typically found between 100 and 1,000 meters (330 and 3,280 feet) and for ducting about 500 to 3,000 meters (1,600 to 9,800 feet), and the duration of the events are typically from several hours up to several days. Higher frequencies experience the most dramatic increase of signal strengths, while on low-VHF and HF the effect is negligible. Propagation path attenuation may be below free-space loss. Some of the lesser inversion types related to warm ground and cooler air moisture content occur regularly at certain times of the year and time of day. A typical example could be the late summer, early morning tropospheric enhancements that bring in signals from distances up to few hundred kilometers (miles) for a couple of hours, until undone by the Sun's warming effect.