अडकलेली - भाग ६ - (अंतिम भाग) : सुटका आणि पुर्नभेट..!!
___________________________________________
रेणुका आपल्या गावी परतली. घराच्या अंगणात पाऊल टाकताच आपलं भकास पडलेलं घर, त्या घरापुढलं ओसाड अंगण पाहून ती आतून तुटली.
माणसांशिवाय कुठल्याही वास्तूला , जागेला, चैतन्य, सजीवता, रूप नाही हे अगदी खरं आहे.
गावातल्या लोकांनी रेणुकाला कधी गुन्हेगार मानलं नव्हतंच. तिच्याबद्दल सर्वांना विलक्षण आपुलकी वाटत होती. गावातल्या बऱ्याच जणांनी तिला त्या घरात राहू नये म्हणून सुचवलं, पण तिने त्यास नम्रपणे नकार दिला.
अडकलेली भाग-५ : रेश्मा, देवदासी आणि रेणुकाची सुटका..!!
__________________________________________
" जा.. कही जा के मर जा... पैदा होते ही, अपने बाप को खा गया.. अब मुझे खा..!" भयंकर संतापलेली रेश्मा आपल्या पाच वर्षाच्या मुलावर खेकसत, त्याच्या पाठीत रागारागाने रट्टे घालत होती. तिला आपल्या मुलाला असं मारताना पाहून कादंबरी धावत तिच्याजवळ गेली. तिचा हात पकडून म्हणाली.
" रेश्मा, का मारतेस गं त्याला..??"
अडकलेली भाग - ४ : रेणुका आणि नियतीचा दगा..!!
_________________________________________
कादंबरी त्या शांतचित्ताने बसलेल्या स्त्री कैदी जवळ आली.
" नाव काय तुमचं ..??" तिने हळुवार त्या स्त्रीला विचारलं.
ती स्त्री शांत बसली होती.. आत्ममग्न होऊन तपोवनी ध्यानधारणा करणारी जणू ती एखादी संन्याशीण असावी; असं तिला पाहून कादंबरीला वाटलं.
" रेणुका नाव आहे तिचं....!!" शेजारच्या कैदी स्त्रीने तिला न विचारता मध्येच उत्तर दिलं.
" पोटुश्या सवतीला विहिरीत ढकलून ठार मारलंय तिने, त्याचीचं शिक्षा भोगतेयं ती..!!" त्या स्त्रीने आगाऊपणे अधिकची माहिती पुरवली.
अडकलेली भाग-३ - बंदिवास..!!
_______________________________________
" आरोपी कादंबरी हिच्या विरोधात सादर केलेले सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी कादंबरी हिच्या वरचा अर्भक हत्येचा गुन्हा सिद्ध होत असून , हे न्यायालय आरोपी कादंबरी हिस आपल्या नवजात अर्भकाच्या हत्येप्रकरणी सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. हे हत्या प्रकरण आई - मुलाच्या नात्याला काळीमा फासणारं असून सदर गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली ही सजा योग्यच आहे..!!" असा शेरा मारत न्यायाधीशांनी अर्भक हत्या प्रकरणी कादंबरीला सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली ; आणि प्रकरण निकालात काढलं.
अडकलेली- भाग २ - अपराध
_________________________________________
स्मशानभूमीत लाकडी चिता रचलेली. उषाचा संवेदना विरहित देह चिरनिद्रा घेण्यासाठी त्यावर विसावलेला. चितेवरच्या आपल्या आईचा अचेतन देह पाहून अतिशय दुःखावेगाने आक्रोश करणार्या कादंबरीला पाहून तिथे असलेल्या उपस्थितांचं अंतःकरण द्रवलं. तिची काळजी करणारं, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारं, तिच्या रक्ताचं माणूस नियतीने आज तिच्यापासून दूर नेलं होतं... कायमचंच..!!
अडकलेली - भाग १ - कादंबरी
_________________________________________
"येऊन.. येऊन ...येणार कोण...?
" उत्तमभाऊ शिवाय आहे तरी कोण...?"
"उत्तमभाऊंचा.... विजय असो..!"
" आला रे ss आला .. जनसेनेचा वाघ आला ss ..!"
उत्तमभाऊंच्या विजयी घोषणांनी सारा आसमंत दणाणून चालला होता. उघड्या जीपमधून उत्तमभाऊंच्या विजयाची मिरवणूक निघालेली. उत्तमभाऊंचे समर्थक, जनसेना पक्षाचे हौशी कार्यकर्ते अगदी जोशात डिजेच्या तालावर नाचत होते. सगळीकडे एक उत्साह संचारलेला..!!! रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल व फुलांची उधळण सुरू होती.