फटका

भोग भोगता आयुष्याचे

Submitted by पुरंदरे शशांक on 12 March, 2019 - 02:51

भोग भोगता आयुष्याचे

भोग भोगिता आयुष्याचे भोग कधि हे टळले का
उठून जाता क्षणात इथूनी उमजून काही आले का

माझे माझे म्हणता म्हणता दूर दूर ते गेले का
कोण नेमके दूर जवळचे कधीच नाही कळले का

अजून हाती यावे काही आस कधी ती थकली का
हातामधूनी निसटून जाता शिल्लक काही उरली का

मीच एकटा रसिक गुणी अन् दानशूरही मीच निका
वाजे डंका किती काळचा लोक बधीर हे झाले का

चढता पडता जरा ढकलता पुढेच ना मी गेलो का
चहूकडून अंधारुन येता कुठे जातसे कळेल का

भास पुराणे किती काळचे भ्रमणातूनि सरले का
सत्यत्वाचा भास जरासा दचकावून तो जातो का

शब्दखुणा: 

सोशल' फटका

Submitted by Ramesh Thombre on 14 December, 2011 - 05:25

'

सोसलं तेवढं करत जा रे, सोशल सोशल करू नको
सोशल असते सत्यामध्ये, व्हर्चुअली तू झुरू नको

नेटिंग, सेटिंग, च्याटिंग गडबड करू नको
उगी रहावे, काम करावे, निष्फळ बडबड करू नको

फेसबुकावर मित्र हजारो, शेजार्याला विसरू नको,
सोशल होतील बोल इथे, शब्दांमधुनी घसरू नको.

मिठी मारुनी, चित्र काढुनी, अल्बम सगळा टाकू नको
सोशल वरती उघडे केले, आता पिसारा झाकू नको !

झक मारितो झकरबर्गही, नियंत्रण ना असे इथे,
रस्त्यावरती येते सगळे, घरासारखा पसरू नको !

ह्यकर्स असती इथे तिथे, तू त्यांना थारा देऊ नको,
झापड बांधून डोळ्यावरती, नको तिथे तू जाऊ नको.

गुलमोहर: 

माझा नवरा पैसं खातो

Submitted by पाषाणभेद on 12 October, 2010 - 00:07

माझा नवरा पैसं खातो

खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
अहो खातो माझा नवरा पैसं खातो
जातो जातो माझा नवरा मुन्शिपाल्टीत कामाला जातो ||धृ||

आठवड्याला नवी साडी घेई
पोराबाळांना खावू रोज देई
पण दारू लई जास्त पितो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा पोलीस श्टेशनात कामाला जातो ||१||

रस्त्यावर तो उभा राहतो
शिट्टी मारून लायसन पाहतो
पावतीचं पैसं खिशात टाकतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला

Submitted by पाषाणभेद on 13 September, 2010 - 09:44

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला
शालिनता गेली सारी कुठं, दिखावूपणा राहीला ||धृ||

आईवडील मोठे करती मुलाला
आजारपणात साथ देती त्याला
शिक्षण देती गुणाचा व्हायला
म्हातारपणी मुलगा पांग फेडी
वृद्धाश्रमी धाडी म्हातार्‍या आईबापाला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||१||

शिक्षक विद्यार्थी नाते किती पवित्र असे
शिष्य गुरूला आधी वंदन करीत असे
आदराने मान झुकवूनी विद्यार्थी बोलायचा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फटका