टाकाऊतून टिकाऊ
टाकाऊतून टिकाऊ
अधून मधून कसल्याश्या सुरसुर्या येतात. आणि मग असं काहीतरी करत बसते.
काही वेळा ड्रेसला स्लीव्ज आत नुसते शिवलेले असतात. जर तो ड्रेस स्लीवलेस वापरला तर या स्लीव्ज तश्याच रहातात. या पिशवीचा तळचा भागासाठी या स्लीव्ज वापरल्या आहेत.
ही पिशवी जुन्या कुर्त्याच्या घेरापासून बनवली आहे.
आत स्पंज असल्याने आकार चांगला टिकला आहे.
जुन्या सोफा कव्हरातले तुकडे उरले होते. त्याची ही पर्स.
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली'
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET)
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन)
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स
आमच्या घरात पेपर वाचून झाल्यावर जागेवर ठेवण्यावरून नेहमी वादावादी होते. एके दिवशी नेटवर हा बॉक्स पाहिला. लगेच पसरलेले पेपर गोळा करून ५-६ बॉक्सेस बनवले. आता ह्यांचा उपयोग रद्दी, लेकाने गोळा केलेला त्याचा खजिना, खेळणी, लॉन्डी बॅग अश्या वाटेल त्या गोष्टी ठेवण्यासाठी होतो आहे.
साहित्य :-
वर्तमानपत्र
गोंद
बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी
टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ३ - स्वरूप
मायबोली आयडी: स्वरुप
वस्तूचे नाव: दीपमाळ/पणतीचे स्टँड
प्रेरणा: घराच्या रिनोव्हेशनचे काम नुकतेच झाल्यामुळे पडुन असलेले खुप सारे मटेरिअल, इंजिनीअरींग संपुन नोकरी लागेपर्यंतच्या कालावधीत मिळणारा निवांत वेळ आणि जवळ आलेली दिवाळी
स्पर्धा माहित व्हायच्या खूप आधीच (म्हणजे ७ वर्षे आधी :फिदी:) हा उपद्व्याप केल्याने स्टेप बाय स्टेप फोटो काढले नव्हते. आता जे मिळाले तेच फोटो टाकतोय.
साहित्य :
टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. २ - भरत मयेकर
टाकाऊतून टिकाऊ :
शुभेच्छापत्रे आणि लग्नाच्या आमंत्रणपत्रिका वापरून केलेला आकाशकंदिल.
साहित्य : शुभेच्छापत्रे, आमंत्रणपत्रिका, आवडत्या रंगाचा जिलेटिनपेपर किंवा पतंगाचा कागद, दोरा.
१) शुभेच्छापत्रे घेऊन त्यावर आतील/कोर्या बाजूने ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढावे.
२) आता ६ सेमी त्रिज्येच्या कंपासच्या (वर्तुळक) सहाय्याने वर्तुळाच्या परिघावर सहा खुणा कराव्यात. यातले एकाआड एक बिंदू जोडून एक समभुज त्रिकोण आखून घ्यावा. टोच्याच्या(कंपास/वर्तुळक) सहाय्याने या त्रिकोणाच्या रेषा किंचित दाब देऊन पक्क्या करून घ्याव्यात.
Pages
