टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. २ - भरत मयेकर

Submitted by संयोजक on 14 September, 2010 - 00:12

टाकाऊतून टिकाऊ :

शुभेच्छापत्रे आणि लग्नाच्या आमंत्रणपत्रिका वापरून केलेला आकाशकंदिल.

साहित्य : शुभेच्छापत्रे, आमंत्रणपत्रिका, आवडत्या रंगाचा जिलेटिनपेपर किंवा पतंगाचा कागद, दोरा.

१) शुभेच्छापत्रे घेऊन त्यावर आतील/कोर्‍या बाजूने ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढावे.

२) आता ६ सेमी त्रिज्येच्या कंपासच्या (वर्तुळक) सहाय्याने वर्तुळाच्या परिघावर सहा खुणा कराव्यात. यातले एकाआड एक बिंदू जोडून एक समभुज त्रिकोण आखून घ्यावा. टोच्याच्या(कंपास/वर्तुळक) सहाय्याने या त्रिकोणाच्या रेषा किंचित दाब देऊन पक्क्या करून घ्याव्यात.
वर्तुळाच्या केंद्रस्थानी एक रुपयाचे नाणे ठेवून त्याभोवती वर्तुळ आखून घ्यावे, (चित्र क्रमांक १)

TT_BharatMayekar_chitra1.jpg

२) वर्तुळ कापून घ्यावे. आतील लहान वर्तुळाचा भागही कापून काढावा. वर्तुळातील त्रिकोणाच्या रेघांवर घडी घालून घ्या. आखलेल्या त्रिकोणाच्या रेषांवर रंगीत/बाहेरील बाजुस कागद दुमडून घ्यावा.व बाजूच्या पाकळ्या त्रिकोणास काटकोनात येतील अशा उघडून घ्याव्यात (चित्र क्र. २अ)

TT_BharatMayekar_chitra2a.jpg

३)प्रत्येक वर्तुळाला आतल्या (कोर्‍या) बाजूने जिलेटीन पेपर किंवा पतंगाच्या कागदाचा लहान चौकोनी/त्रिकोणी तुकडा चिकटवावा.

४)आता या १९ त्रिकोणातील ५ त्रिकोण एकास एक असे , फ़क्त त्रिकोणाच्या बाहेरचा भाग(पाकळी) ,चिकटवून एक टोपी तयार करा.(चित्र क्र.३).

TT_BharatMayekar_chitra3.jpg

अशा आणखी २ टोप्या तयार करा. या टोप्या नीट वाळल्यावर पुढली कृती करावी.

७) उरलेल्या ४ पैकी एक त्रिकोणाकार घ्या. हा आपला पाया असेल. त्याच्या प्रत्येक पाकळीला एकेका टोपीची एकेक पाकळी चिकटवा. या टोप्यांच्या एकमेकांकडल्या बाजूची एकेक पाकळी चिकटवुन घ्या. आता प्रत्येक टोपीच्या २ पाकळ्या दुसर्‍या टोपीला तर एक पाकळी पायाला चिकटलेली असेल. दोन पाकळ्या मोकळ्या असतील. या दोन दोन पाकळ्यांमधे उरलेले ३ त्रिकोण जुळवून चिकटवा. वर एक त्रिकोण मोकळा दिसेल, त्यातून बल्ब सोडता येईल. टांगण्यासाठी या त्रिकोणांच्या पाकळ्यांना छिद्रे पाडून त्यातून धागा गुंफ़ून बांधून घ्यावा.
पूर्ण तयार झालेला कंदिल चित्र क्र. ४.

TT_BharatMayekar_chitra4.jpg

टीपा : वेळ वाचवण्यासाठी ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ सीडीच्या सहाय्याने काढता येईल. वर्तुळावरील खुणा करताना कंपास/वर्तुळकाची त्रिज्या ६.१ सेमी घ्यावी लागेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

सुंदर.

हा मी गेल्या दिवाळीला केलेला. शाळेत शिकलेला. तेव्हा जमला नव्हता! मग कॉलेजच्या दिवसात परत एकदा करून बघितला, तेव्हा मापे आठवत नव्हती, त्यामुळे पहिले मिनिएचर मॉडेल तयार झाले टेनिस बॉलच्या आकाराचे. मग मात्र हात बसला.
कार्डपेपरपेक्षा शुभेच्छापत्रांचा खूपच छान होतो, कारण आताचे कार्डपेपर्स अगदी पातळ हलके असतात.
षटकोनांचा कंदिल? म्हणजे काड्यांचा की अन्य काही? मी पहायला आणि शिकायला उत्सुक आहे.

चिकटवणे, सुकवणे हे करण्यापेक्षा फटाफट स्टेपल पीन्स मारायच्या Happy

हा कंदिल मी गेल्या वर्षीच बनवला होता, तेव्हा आणखी मधल्या पायर्‍यांचे फोटो टाकायचे तर पुन्हा बनवावा लागेल.
तशीही या स्पर्धेसाठी ४ फोटोंची मर्यादा आहे.
बघून वाटतो तितका तो करताना कठीण वाटू नये. शेवटच्या आकारापर्यंत पोचायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चुकीची शक्यता जवळपास नसलेली पद्धत मी इथे दिली आहे.