रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET)

Submitted by रचना. on 25 June, 2012 - 06:50

सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्‍यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.

ह्याचा आकार साधारण २ इंच बाय १ इंच आहे.

ही पेस्ट्रि खास लाजो साठी

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988

गुलमोहर: 

____________________/\____________________ चिकाटीला साष्टांग आहे.
मस्त जमलाय टी सेट

कसलं गोड आहे हे! चमच्याच्या लांबीइतका आख्खा टीसेट! डिटेलिंग पर्फेक्ट आहे! खरंतर तो चमचा दिसेपर्यंत हे प्रकरण इतकं छोटंसं आहे असं वाटतही नाही! भारी!

मस्त आहे.................
.
.
.
हे आपल्याला झेपणार नाही........... Sad .. Lol ..........सोपे सोपे टाकत जावा ओ......... ऑफिस मधे फवल्यावेळेत करत बसायाला बर असते Happy

भारी आहे. कृपया कृती लिहिण्याचे करावे. करून बघणे अशक्य वाटतेय, पण कसे केले याचे कुतूहल शमविण्यासाठी.

लिंबुटिंबु,
फोटो पिकसावरून अपलोड केले आहेत.
भरत मयेकर,
कृपया कृती लिहिण्याचे करावे. करून बघणे अशक्य वाटतेय, पण कसे केले याचे कुतूहल शमविण्यासाठी. >>>ओ, तुमचं कुतुहल शमवतांना माझं डोकं भंजाळेल, त्याचं काय ? Light 1
कृतीत खरतर फार काही नाहीये. पण इथे फक्त लिहून समजावणं कठिण वाटतं. मी स्वतःच लिहिलेली कृती नंतर वाचतांना माझ्या डोक्यावरून जाते. वेळ मिळाल्यास व्हिडिओ तयार करून युटुबवर टाकेन.
ह्यात टेक्निक एकच आहे पुंगळ्या तयार करायचे. पुंगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या जोडलेल्या आहेत.
पुंगळ्या http://www.maayboli.com/node/35779 प्रमाणे करयच्या.

आता बघा काय कळ्तय का ? (डोकं त्या पुंगळ्यांसारखं घरघर फिरल्यास मी जबाबदार नाही.) Wink
कळल्यास मलाच समजवुन सांगा मी काय लिहिलय ते. Happy

Pages