*"प्रेम वेडा"* कोण आहे,माहित नाही पण प्रेमाच्या अनुषंगाने मी नवीन रचना लिहिली आहे.मला खात्री आहे ही रचना तुम्हाला नक्की आवडेल.
प्रेम वेडा !
कुणीतरी दिसाया लागलं
स्वप्नात माझ्या.....….....
फुलपाखरू उडाया लागलं
मनात माझ्या.....….......
इशारा कळाया लागला
नजरेला माझ्या......…
कुणीतरी घर कराया लागलं
हृदयात माझ्या................
तिचं नाव लिहाया लागलं
कवितेत माझ्या.....…....
कधी इथं कधी तिथं
इकडं-तिकडं भास व्हायाला लागलं
डोळ्याला माझ्या..…...................
कवी जग्या यांच्या "प्रेमात पडला Electronics Engineer" http://www.maayboli.com/node/19454 या कवितेवरून प्रेरीत.........
प्रेमाचा interface माझा
तुच implement कर
आहे तुझा मी object
आता तुच observe कर.
रोज वाटते तुला घेउन
करावे build run
Error काहि संपत नाहीत
थकले माझे brain
Performance थोडा वाढावा म्हणुन
Hard-disc केली scan
Virus काही निघत नाही
बसलं गप्प ध्यान
निराश झालो कारण झाले
Disconnect आमचे intranet
तेवढ्यात inbox मधे दिसला एक mail
असेल का हो आमंत्रण घ्यायला 'गाठ्भेट' ?
वाटले मलाही 'Pyar to hona hi tha'
अन आयुष्याची Life cycle झाली सुरु