प्रेम वेडा !

Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 06:46

*"प्रेम वेडा"* कोण आहे,माहित नाही पण प्रेमाच्या अनुषंगाने मी नवीन रचना लिहिली आहे.मला खात्री आहे ही रचना तुम्हाला नक्की आवडेल.

प्रेम वेडा !
कुणीतरी दिसाया लागलं
स्वप्नात माझ्या.....….....
फुलपाखरू उडाया लागलं
मनात माझ्या.....….......

इशारा कळाया लागला
नजरेला माझ्या......…
कुणीतरी घर कराया लागलं
हृदयात माझ्या................

तिचं नाव लिहाया लागलं
कवितेत माझ्या.....…....
कधी इथं कधी तिथं
इकडं-तिकडं भास व्हायाला लागलं
डोळ्याला माझ्या..…...................

ओठांवर हसू फुलाया लागलं
गालात माझ्या..................
जरासा बोलशील का?
असं कुणीतरी बोलाया लागलं
प्रेमात माझ्या....................

उन्हात चांदणं पडाया लागलं
गावात माझ्या..................
सूर गवसाया लागलं
गाण्यात माझ्या.....

कुणीतरी प्रेम वेडा बोलाया लागलं
प्रेमात माझ्या..........................
सारखं सारखं चिडवाया लागलं
नावानं माझ्या......................

फुलाचा सुगंध पसराया लागलं
श्वासात माझ्या...................
मनाचं सुंदरता दिसाया लागलं
प्रियेत माझ्या.......…...…........

रातीचा दिस व्हायाला लागलं
आठवणीत तुझ्या..............
प्रेमाची वाट शोधाया लागलं
आयुष्यात माझ्या.............

दिव्याची वात पेटाया लागलं
येण्याने तुझ्या..................
लख्ख उजेड पडाया लागलं
संसारात माझ्या......…....

*विनोद इखणकर (शब्दप्रेम)*

Group content visibility: 
Public - accessible to all site users