अस्वस्थ मी

आतला आवाज

Submitted by राहुल नरवणे. on 3 July, 2013 - 09:19

स्वतः शी जेव्हा होते युद्ध,
तेव्हा चवताळलेला प्रतीयोद्धा
करतो जो आवाज …

आतून अडकलेल्या ‘मी’ ला,
बाहेर काढण्यासाठीची साद . .

पांढऱ्या शुभ्र दिसण्याऱ्या निर्जीव
राखेतील आग . . .

मुक्या आणि घुसमटलेल्या प्रवृत्तीच्या
मन: पटलावरची हालचाल . .

प्रचंड गर्दीत, लोकलच्या प्रचंड खडखडात,
असह्य वातावरणात सुचलेलं गाणं,
अन ओठांची आपसूक हालचाल .

भरमसाठ रंगांनी ओरबडलेल्या,
माखलेल्या कॅनवास वरचा
आवडत्या रंगाचा एकच स्ट्रोक …

प्रांत/गाव: 

अस्वस्थ मी

Submitted by नितीनचंद्र on 6 September, 2010 - 18:14

अस्वस्थ मी, संत्रस्त मी
जन्मांतरीचा पांथस्त मी

सेवुनीया सर्व अन्न ब्रम्हा
अधाशी उपाशी असा हीन मी

सुखावलो ना कधी शब्द ब्रम्हे
शोधुनी सर्व साहित्य अतृप्त मी

गुंतुन सदा तुझ्या नाद ब्रम्हा
अस्तीत्व माझे अन माझ्यात मी

सहवास अवघा क्षणाचा मिळावा
नुरावा दुरावा, उरावा न मी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अस्वस्थ मी