अस्वस्थ मी

Submitted by नितीनचंद्र on 6 September, 2010 - 18:14

अस्वस्थ मी, संत्रस्त मी
जन्मांतरीचा पांथस्त मी

सेवुनीया सर्व अन्न ब्रम्हा
अधाशी उपाशी असा हीन मी

सुखावलो ना कधी शब्द ब्रम्हे
शोधुनी सर्व साहित्य अतृप्त मी

गुंतुन सदा तुझ्या नाद ब्रम्हा
अस्तीत्व माझे अन माझ्यात मी

सहवास अवघा क्षणाचा मिळावा
नुरावा दुरावा, उरावा न मी

गुलमोहर: 

सुंदर कविता...लिहीत रहा..धीर सोडू नका....लवकरच गझल तुम्हाला हात देणार आहे..खूप खूप शुभेच्छा

गंगाधरजी, विजयजी धन्यवाद,

हे काव्य लिहुन झाल्यावर मी तपासल तेव्हा लक्षात आल की यात काफियाच नाही. नुसत रदिफ असण्याला काही अर्थ नाही कारण घोड्यावर स्त्री मागे बसली आहे पण घोड्याचा लगाम धरायला कोणी नाही.

या शिवाय वृत्त ,छंद याचा मला अभ्यास नाही.

हे काव्य आहे मला मान्य आहे.

गंगाधरजी,

आपण पाठवलेली लिंक माझ्या निवडक १० मध्ये आहे.

अस्वस्थ मी, संत्रस्त मी
जन्मांतरीचा पांथस्त मी

सेवुनीया सर्व अन्न ब्रम्हा
अधाशी उपाशी असा हीन मी
सेवुनीया सर्व अन्न ब्रम्हा
हीन मी अधाशी उपाशी असा

सुखावलो ना कधी शब्द ब्रम्हे
शोधुनी सर्व साहित्य अतृप्त मी
सुखावलो ना कधी शब्द ब्रम्हे
शोधुनी सर्व साहित्य अतृप्त मी असे

गुंतुन सदा तुझ्या नाद ब्रम्हा
अस्तीत्व माझे अन माझ्यात मी
गुंतुन सदा तुझ्या नाद ब्रम्हा
अस्तीत्व माझे अन मी माझ्यात असे

सहवास अवघा क्षणाचा मिळावा
नुरावा दुरावा, उरावा न मी
सहवास अवघा क्षणाचा मिळावा
उरावा न मी, नुरावा दुरावा

असे लिहीलेले चालेल का?

आवडले म्हणुन विचारले.