कॉफी विथ रिझन

Submitted by एविता on 8 July, 2020 - 02:15

"मी नाव विसरले त्या पुस्तकाचं.. खरेदी कशी टाळावी.. किंवा खरेदी कशी वाईट सवय आहे असंच काहीसं होतं त्याचं नाव.."मी क्रॉसवर्डच्या सेल्समनला सांगत होते.

" मी तुझ्या बाजूलाच हातातलं मासिक चाळत तू त्या सेल्समनला काय विचारत होतीस ते ऐकत होतो. मला ठाऊक होतं त्या पुस्तकाचं नाव पण मी बोललो असतो तर तू "आलाय मोठा शहाणा", किंवा, "ही तरुण मुलं मुलींवर इम्प्रेशन मारायची संधी सोडतच नाहीत", किंवा "आगाऊ कुठला", वगैरे वगैरे वाक्यं मनात म्हणत कपाळावर आठ्या चढवशील असं वाटलं म्हणून मी गप्प बसलो. शिवाय तुम्हा दोघांच्या चालत्या बसमध्ये चढताना पडलो असतो किंवा कंडक्टरनं उतरवलं असतं तर?"

" मला कंडक्टर म्हणतोस?"

" बरं... ड्रायव्हर... खूष..?"

मी हसले. " बरं, मग तू काय केलंस?

" द सिक्रेट ड्रीमवर्ल्ड ऑफ शॉपोहोलिक, बाय सोफी किन्सेला.. मी बोललो. तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटलं की ते पुस्तक तुला घ्यायचच आहे आणि ते नाही मिळालं तर तुझा विरस होईल म्हणून मी आगाऊपणा केलाच. पण तू लगेच 'ओह येस्' असं म्हणत हसलीस आणि 'thank you सो मच' असं म्हणत माझ्या अगाउपणाचं स्वागतच केलंस.

" होय,पण तुझा आगाऊपणा अजून संपला नव्हताच." मी हसतच म्हणाले.

" हो? एकदा माहिती द्यायची तर पूर्ण द्यावी. जे जे आपणासी ठावे ते ते सर्वांसी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन या मताचा मी आहे."

"हो की..! म्हणून तू लगेच ह्या पुस्तकावरून एक मूव्ही पण बनला आहे हे ही सांगितलस त्या डीवीडी सेक्शन कडे हात दाखवत. " कन्फेशन ऑफ अ शॉपोहोलिक."

"पण तेवढ्यावरच तू थांबलीस का? 'अगोदर मूव्ही पाहिला की पुस्तक वाचलं' असं तू मला विचारलं की!"

" हा हा हा," मी हसून म्हणाले," पहलीही मुलाकात मे आप हमारा दिल जीतने कि कोशिश कर रहे थे। म्हणून मी पण हवा देत राहिले. पण तू उत्तर छान दिलंस ऋ... लेखक आणि डायरेक्टरचा हेतू एकच आहे की लोकांनी इंपल्स बाईंग बंद करायला हवे. वाव..!"

" पर आप ने हवा देते देते पंखे का स्पीड बढ़ा दिया। इतकी हवा दिली कि "पुस्तक वाचल्यावर आणि मूव्ही बघितल्यावर काही फरक पडला का?" असं तू विचारलं लगेच आणि संवाद वाढवायला सुरुवात केलीस...."

" हो आणि मूव्ही बघितल्यावरच मी हे शॉपिंग करतोय असं तू उत्तर दिलंस."

आम्ही दोघं हसलो. "मग काय झालं रे?" मी प्रश्न केला.

"मग काय होणार? आपण दोघं काउंटरवर बिल द्यायला गेलो, मी पाचशे ची नोट काढली तोवर तू पर्स उघडून तुझं आणि माझं दोघांचं बिल भरून टाकलं."

"मग?"

"मी सुटे पैसे घेऊन येतो असं मी तुला सांगितलं तर तू म्हणालीस की कशाला, फक्त पन्नास रुपये तर झालेत."

"मग?"

"प्लीज, जस्ट अ मोमेंट, मी म्हणालो आणि शेजारच्या स्टेशनरीच्या दुकानात गेलो, पेन विकत घेतले, पैसे सुटे केले आणि तुला दिले पन्नास रुपये." तू म्हणालास.

"मग?"

"मघापासून सारखं मग, मग, करती आहेस एविता तू, मगभर चहा हवाय का तुला?" तू बोललास.

"अरे, अरे, अरे, अरे, रुक जाओ ना जी, ऐसी क्या जल्दी असं मी मधुबाला सारखं गाणार होते रे पण तुला जायची घाई दिसली म्हणून मी काही बोलले नाही." मी उत्तर दिलं.

"घरी जाताना मी विचार केला की चालत्या बसमध्ये मी चढलो तरीही कंडक्टरने मला खाली का उतरवले नाही?."

" देन?" मी विचारलं.

"देन म्हणजे?" तू डोळे मिचकावत विचारलं.

" देन म्हणजे तू मघाशी ज्याच्यातून चहा देणार होतास ते." मी पण डोळे मिचकावले.

मला आणि तुला हसू आवरेना...

" देन आय वेंट होम, इंटो माय रूम अँड ओपण्ड द मॅगझिन.
Coffee @ CCD Malleshvaram? 6 p.m.Today. तू लिहिलेलं मी वाचलं."

" हाहाहा.. तुझ्या मनात काय विचार आला त्या वेळी?" मी परत हसत तुला विचारलं.

" मी विचार केला की चालत्या बसमध्ये मी चढलो, कंडक्टरने उतरवलं तर नाहीच, उलट बसायला जागाही दिली आणि तिकीट पण दिलं, फुकट. वा व्वा व्वाव्वा.."

मग आम्ही दोघं एकदमच जोरात हसलो आणि म्हणालो,"और शुरू हो गई अपनी लव स्टोरी."

Group content visibility: 
Use group defaults

नव्या धाटणीची लेखन शैली आणि हल्के फूलकी कथा आवडली. खुप दिवसांनी इकडे काहीतरी रिफ्रेशिंग वाचयला मिळाले.

छान आहे कथा.

एक आगाऊ प्रश्नः तुमच्या प्रत्येक कथेत नायिकेच नाव तुमचा आयडी म्हणजे एविता का असत?

@ आनंदा, अमा, अज्ञानी, विरू आणि नियती. I am so happy for your appreciation. @ ऋ...नील!, अगाऊ बिगाऊ काही नाही. Je t'aime! माझ्या नवऱ्याचे नाव ऋषीन आणि मी त्याला ऋ... हाक मारते. माझे नाव खरेच एविता आहे. आणि मी ज्या कथा लिहिते त्या खऱ्या घडलेल्या आहेत. मी फ्रेंच सिटीझन होते. आई भारतीय आणि वडील फ्रेंच. मी साऊथ इंडियनशी लग्न केलंय. बेंगलोरला राहते. वडिलांचा मराठी संत साहित्याचा बराच अभ्यास होता त्यामुळे मराठीची गोडी लागली. असो. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे माझे मराठी चुकत नाही याची खात्री पटते. Merci beaucoup !

छान लिहिलं आहे...

"अरे, अरे, अरे, अरे, रुक जाओ ना जी, ऐसी क्या जल्दी" -->आनंंद आहे तुम्हाला तुमचंं प्रेम इथेच मिळलं!!

"आज जाने की जिद ना करो" -->फरिदा खानूम सारखी तळमळ नाही वाट्याला आली.

मी इथून ब्रेक घेतला आहे फक्त वाचनमात्र राहणार होतो पण तुमचा वरचा प्रतिसाद वाचून राहवलं नाही म्हणून कमेंट करतोय..

अरे वा!! खरी गोष्ट आहे. आय मस्ट सेय दॅट यु आर लाईफ सो हॅपनिंन देन.. नाहीतर अशा गोड लव्हस्टोरीज रिअल लाईफमध्ये खुप कमी असतात. तुमच्या वडिलांविषयी आदर वाटला. फ्रेंच असून मराठी साहित्याबद्दल त्यांची ओढ आणि अभ्यास ऐकून छान वाटलं.. बाय द वे तुमचं मराठी छानच आहे.. आपली मराठी गोडी लागण्यासारखीच आहे....तुमच्या वडिलांवरून मला लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो आठवले.. ख्रिश्चन असूनही त्यांचा मराठी संताविषयी भरपूर अभ्यास होता .

खुपच आवडली क्युट लव स्टोरी, मला तुझी शैली आवडते. आणि प्रत्येक गोष्टीत स्वतः चं नाव हे पण आवडलं. तुझी माहिती वाचून तर एकदम भारी वाटलं

@ मनस्विता, धनुडी. Thanks.साठीच्या दशकात सोनोपंत दांडेकर यांचेकडे बाबांचे दोन मित्र संत साहित्याचा अभ्यास करायला पुण्यात एस पी कॉलेज जवळ रहात होते. त्यांची नावे मला माहीत नाहीत. त्यांच्या मुळे बाबांना पण मराठीची गोडी लागली. बाबा सोर्बोन विद्यापीठात शिकत होते तेंव्हा आई पण शिकत होती. आई काळी सावळी आणि बाबा गोरे. माझे खरे नाव प्रिस्टिन. पण आई एवीेता म्हणून बोलावते. मी पण आई वर जाऊन काळी सावळी झाले आहे. मला फ्रेंच, मराठी, हिंदी आणि कानडी चांगले येते. आई कानडी आहे. पुढचा इतिहास एवढा रंजक नाही. त्यामुळे मी आई बरोबर बेंगळुरू येथे स्थाईक झाले. असो. तुमच्या सर्वांचे आभार.