दिल से हिंदुस्तानी
( पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्यरंग’ दिवाळी अंक २०२५ [या लेखाची संक्षिप्त आवृत्ती] )
गेल्या तीन दशकात म्हणजे उदारीकरणाच्या धोरणानंतर आणि ‘आय.टी.’ सेक्टरची बूम आल्यावर अनेक भारतीय नागरिक जगभरात विशेषत: अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी युरोपियन देश, येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झालेले दिसतात. पण त्याआधी परदेशांत भारतीय नागरिकांचे प्रमाण अपवाद वगळता फारच तुरळक असे. तथापि क्रिकेटमध्ये आढळून येईल की फार पूर्वीपासून अनेक भारतीय खेळाडू वेस्ट इंडिज, इंग्लंड तसेच १९९१ सालानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आले आहेत.