हुंडा

हुंडा (शतशब्दकथा)

Submitted by दासानु दास on 29 August, 2018 - 09:05

“परांजपे, समीरलाही राधिका पसंत आहे, आमचा आधीपासूनच होकार होता”

“अरे वा, अभिनंदन! तैयारीला सुरूवात करावी लागणार..”

“आपण देण्याघेण्याबद्दलही आताच चर्चा करून घ्यायला हवी.”

“म्हणजे हुंडा?? मी हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. हुंडा आमच्या तत्वात बसत नाही”

“काय बोलताय? कसले तत्त्वं?”

“हेच की, भीक मागणार्याच्या घरात माझी मुलगी सून म्हणून जाणार नाही.”

“खूप बोललात पटवर्धन! निघतो आम्ही...”
***
“वृषभ पटवर्धन?”

“बोलतोय!”

विषय: 
शब्दखुणा: 

हिपोक्रसी १ - हुंडा

Submitted by कटप्पा on 6 July, 2018 - 12:55

स्थळ - कॅफेटेरिया

ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का?

तो - नाही ना. अजून काही नाही.

ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना?

तो - नाही. का विचारले असे?

ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली.

तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास?

ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते. मुलाचा पगार माझ्या दुप्पट असला पाहिजे आणि स्वतःचा फ्लॅट हवा 2 bhk.

तो - हाच फक्त criteria होता?

ती - हो.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हुंडा