हुंडा (शतशब्दकथा)

Submitted by दासानु दास on 29 August, 2018 - 09:05

“परांजपे, समीरलाही राधिका पसंत आहे, आमचा आधीपासूनच होकार होता”

“अरे वा, अभिनंदन! तैयारीला सुरूवात करावी लागणार..”

“आपण देण्याघेण्याबद्दलही आताच चर्चा करून घ्यायला हवी.”

“म्हणजे हुंडा?? मी हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. हुंडा आमच्या तत्वात बसत नाही”

“काय बोलताय? कसले तत्त्वं?”

“हेच की, भीक मागणार्याच्या घरात माझी मुलगी सून म्हणून जाणार नाही.”

“खूप बोललात पटवर्धन! निघतो आम्ही...”
***
“वृषभ पटवर्धन?”

“बोलतोय!”

“दुपारच्या व्यवहाराबद्दल माफी मागतो. परंतू समीर त्याच्या हुंडाविरोधी तत्त्वांवर ठाम होता आणि त्याला त्याच तत्त्वांवर ठाम असणार्याद घरातली मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्याच्या ह्या अटीमुळे मला तुमच्याशी असं विचित्रपणे वागावं लागलं. तैयारीला आता जोरदार सुरूवात करा आणि पुन:श्च एकदा, अभिनंदन!”
_____________________________________________________________________________________________________
कथा १०० शब्दांत लिहिण्याचे सर्व श्रेय: टकमक टोक. धन्यावाद सर!
******************************************************************************************************************************************************************************************************************
अजुन एक व्हर्जन अंबज्ञ कडूनः

“ राधिकासाठी आमचा आधीपासूनच होकार होताच आणि समीरलाही राधिका पसंत आहे.”

“अरे वा, अभिनंदन! म्हणजे आता लवकरच पुढच्या तैयारीला सुरूवात करावी लागणार..”

“पण एक अडचण आहे, देण्याघेण्याबद्दलही जरा चर्चा करून घेवुया का ?"

“ओह ! म्हणजे तुम्हालाही हुंड्याची अपेक्षा आहे तर !
हे पहा, आम्ही हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. तुमच्यासाठी आम्ही आमच्या तत्त्वांचं बलीदान करू शकत नाही.”

“कसले तत्त्वं?”

“भीक मागणाऱ्याच्या घरात आमची मुलगी सून म्हणून जाणार नाही.”

“खूप बोललात !
निघतो आम्ही...”

***

‌‌‌‌‌‌‌“हॅलो S पटवर्धन?”

“बोलतोय!”

“समीरही हुंडाविरोधी आहे आणि त्याला तशीच कट्टर मताची मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्याच्या ह्या अटीमुळेच मला तुमच्याशी असं विचित्रपणे वागावं लागलं.

अभिनंदन ...!
लवकरच पुढल्या तयारीला लागूया सगळे
____________________________________________________________________________________________________________
(हुंडा प्रथा निषेधार्थ)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही शब्द गाळले की छान शशक झालं....

“परांजपे, समीरलाही राधिका पसंत आहे, आमचा आधीपासूनच होकार होता”
“अरे वा, अभिनंदन! तैयारीला सुरूवात करावी लागणार..”
“आपण देण्याघेण्याबद्दलही आताच चर्चा करून घ्यायला हवी.”
“म्हणजे हुंडा?? मी हुंड्याच्या ठाम विरोधात आहोत. हुंडा आमच्या तत्वात बसत नाही”
“काय बोलताय? कसले तत्त्वं?”
“हेच की, भीक मागणार्याच्या घरात माझी मुलगी सून म्हणून जाणार नाही.”
“खूप बोललात पटवर्धन! निघतो आम्ही...”
***
“वृषभ पटवर्धन?”
“बोलतोय!”
“दुपारच्या व्यवहाराबद्दल माफी मागतो. परंतू समीर त्याच्या हुंडाविरोधी तत्त्वांवर ठाम होता आणि त्याला त्याच तत्त्वांवर ठाम असणार्याद घरातली मुलगी पत्नी म्हणून हवी होती. त्याच्या ह्या अटीमुळे मला तुमच्याशी असं विचित्रपणे वागावं लागलं. तैयारीला आता जोरदार सुरूवात करा आणि पुन:श्च एकदा, अभिनंदन!”

छान लिहली आहे.
विपु पहा, अजून एक वर्जन दिलीय शशकची Happy

छान कथा!
पण तुमच्या शब्दांतही वाचण्याची ईच्छा आहे. शक्य असल्यास ती सुद्धा टाका ना!