**कर्मयोग्याचे गुज**
Submitted by निखिल मोडक on 28 October, 2020 - 14:56
चन्द्र चांदणीस सांगे
सखे दूर देख
किती शांत तेथे
उभे खाली रुख
तापती तपाने
जसे थोर योगी
तसे भास्कराच्या
तपाने उजळती
खोल ठाव घेती
अंतरीचा धरेच्या
तयाचेनी योगे
उंच आकाशी जाती
सांडूनी फलाशा
कर्मास करिती
कर्मयोगी जसे नित्य
कर्मास पूजती
नसे सावलीचाही
तया मोह काही
जी दिसे लपे नित्य
उदयी नी अस्ती
दिलासे सावलीने त्या
कितीका विसावा
परी तया ठायी न्यून
अहंकाराची न वस्ती
विषय: