पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २७. कुदरत (१९८१)

Submitted by स्वप्ना_राज on 27 November, 2018 - 06:43

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २६. राजकुमार (१९६४)

Submitted by स्वप्ना_राज on 25 November, 2018 - 09:23

220px-Rajkumar_(1964).jpg

एक आटपाट नगर होतं. त्या नगरात किनई शूरसेन नावाचा राजा राज्य करत होता. राजा आणि राणी कुसुमावतीला चंद्रसेन आणि शुभांगी अशी दोन मुलं होती. प्रजा राजाच्या कारभारावर खुश होती. लोक खाऊन-पिऊन सुखी होते. सगळीकडे आबादीआबाद होती. पण एक दिवस अचानक .......

विषय: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २४. महबूबा (१९७६)

Submitted by स्वप्ना_राज on 9 November, 2018 - 11:07

वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोsपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातला बाविसावा श्लोक. अर्थ आपल्या सगळ्यांना माहित असलेला. जसा माणूस जुने कपडे टाकून देऊन नवे परिधान करतो तसाच आत्मा जुनं शरीर टाकून देऊन नवं धारण करतो.

विषय: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २३. अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरीस (१९६७)

Submitted by स्वप्ना_राज on 4 November, 2018 - 03:46

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २२. इत्तेफाक (१९६९)

Submitted by स्वप्ना_राज on 28 October, 2018 - 03:44

index_0.jpg

Chance. Stupid, dumb, blind chance. Just a part of the strange mechanism of the world, with its fits and coughs and starts and random collisions.

-- Lauren Oliver

विषय: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २१. हिमालयकी गोदमें (१९६५)

Submitted by स्वप्ना_राज on 22 October, 2018 - 14:08

खरं खरं सांगा हं. ह्या चित्रपटाचं नुसतं नाव ऐकून त्याच्या कथेची कल्पना करा असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? दूरवर दिसणारी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं, त्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, त्यातून खळखळून वाहणारी निर्मळ नदी, तिच्याकाठी पाणी भरायला आलेल्या नदीइतक्याच अवखळ, अल्लड तरुणी, शहरातून तिथे आलेला उमदा तरुण, त्यातल्याच एका सुंदर तरुणीवर त्याचं प्रेम बसणं, निसर्गरम्य प्रदेशातून बागडत गायलेली सुमधुर गाणी, त्यांच्या प्रेमाच्या मार्गात काटा बनून उभा ठाकलेला कोणी व्हिलन, माफक विरह, थोडा अश्रूपात आणि मग गोड शेवट. अहो, मग तुमचा कयास १००% बरोबर आहे.

विषय: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २०. एक पहेली (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 22 October, 2018 - 13:53

एका चांगल्या रहस्यप्रधान चित्रपटात काय असावं लागतं? पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच घडलेला गुन्हा किंवा तो घडण्याची शक्यता. दुसरी गोष्ट, एकापेक्षा अधिक असे संशयित ज्यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी सबळ कारण आणि तो करण्याची संधी दोन्ही आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना ज्या पाहणाऱ्याला जे पाहतोय त्याचा अर्थ लावायची संधी तर मिळू देत नाहीतच. वर संशयाची सुई सतत सगळ्या संशयितांभोवती फिरवत ठेवतात. आणि शेवटची - चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जे काही प्रश्न पडले असतील त्यांची समाधानकारक उत्तरं मिळतील अश्या पध्दतीने चित्रपटाच्या शेवटी केलेली गुन्ह्याची उकल.

विषय: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १९. धुंद (१९७३)

Submitted by स्वप्ना_राज on 13 October, 2018 - 05:16

‘आपल्या प्रतिभासाधनेत व्यत्यय तर नाही ना आणला मी?’

‘अरे खटणे. या. कसली डोंबलाची प्रतिभासाधना? या बसा. काय म्हणताय?’

‘हे वाचाल का जरा?’ नम्रतेने माझ्या हातात एक वही देत सगाराम खटणे म्हणाला.

‘बघू. काय आहे?’

‘आता हे ललित आहे का परिक्षण ते तुम्हीच सांगायचं आहे.’

‘अरेच्चा! पण आहे काय हे?’

विषय: 

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १८. बिन बादल बरसात (१९६३)

Submitted by स्वप्ना_राज on 7 October, 2018 - 01:21

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १७. लव्ह इन टोकियो (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 4 October, 2018 - 13:37

साठ-सत्तरच्या दशकात (किंवा कदाचित त्याच्या आधीही असेल. ५० च्या दशकातले चित्रपट पाहायची माझी मानसिक तयारी अजून तरी झालेली नाही) बर्‍याच हिंदी चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांना परदेशदर्शन घडवलं. मग तो अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस असो, नाईट इन लंडन असो, द ग्रेट गॅम्बलर (कैरो, लिस्बन, व्हेनिस, रोम) असो की हरे रामा हरे कृष्णा (नेपाळ) असो. अर्थात हेही केवळ हिरो-हिरॉईनला गात बागडायला रमणीय बॅकड्रॉप हवा म्हणून नव्हे तर कथानक परदेशात घडतं म्हणून. ह्याच पठडीतला एक रोमँटिक सिनेमा म्हणजे '६६ साली आलेला लव्ह इन टोकियो.

Pages

Subscribe to RSS - पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त