हिमालयकी गोदमे

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २१. हिमालयकी गोदमें (१९६५)

Submitted by स्वप्ना_राज on 22 October, 2018 - 14:08

खरं खरं सांगा हं. ह्या चित्रपटाचं नुसतं नाव ऐकून त्याच्या कथेची कल्पना करा असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय सांगाल? दूरवर दिसणारी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं, त्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, त्यातून खळखळून वाहणारी निर्मळ नदी, तिच्याकाठी पाणी भरायला आलेल्या नदीइतक्याच अवखळ, अल्लड तरुणी, शहरातून तिथे आलेला उमदा तरुण, त्यातल्याच एका सुंदर तरुणीवर त्याचं प्रेम बसणं, निसर्गरम्य प्रदेशातून बागडत गायलेली सुमधुर गाणी, त्यांच्या प्रेमाच्या मार्गात काटा बनून उभा ठाकलेला कोणी व्हिलन, माफक विरह, थोडा अश्रूपात आणि मग गोड शेवट. अहो, मग तुमचा कयास १००% बरोबर आहे.

विषय: 
Subscribe to RSS - हिमालयकी गोदमे