मराठी गझल

मृत्युला चकवून काही क्षण जगावे

Submitted by रसप on 15 May, 2012 - 10:53

मृत्युला चकवून काही क्षण जगावे
बस तुझ्या हातून थोडे विष मिळावे

ना मला कळले कधी माझे इरादे
मग तुला हे प्रेमही कैसे कळावे ?

रोजचा वळवून रस्ता ये कधी तू
मीच का खाऊन खस्ता रोज यावे ?

गाळली गुलमोहराने सर्व पाने
त्यागुनी सारी सुखे मी मोहरावे

"पाहतो सारेच तो" म्हणतात सारे
"जाणतो सारे" असे केव्हा दिसावे ?

चुरडली कित्येक हृदये पावलांनी
चेहऱ्यावर भाव का भोळे असावे ?

व्याकरण भाषेहुनी ना भिन्न तरिही
भावना मांडायला बेशिस्त व्हावे !

सोड ना 'जीतू' जरा ही बेफिकीरी
मरण आल्यावर तरी डोळे मिटावे !

गुलमोहर: 

खूप चाललो थांबतो

Submitted by उमेश वैद्य on 15 May, 2012 - 06:53

खूप चाललो थांबतो

खूप चाललो, थांबतो आता
आसरा जरा शोधतो आता

ऐकशील का बोलणे माझे?
तर मनातले सांगतो आता

बदललेत संदर्भ काळाचे
हट्ट कालचा सोडतो आता

चांगले न जागेपणी काही
स्वप्न छानसे पाहतो आता

जात पाहुनच लग्न करण्याची
ही परंपरा मोडतो आता

वा! दया क्षमा रूजल्या येथे!
की कसाब ही मागतो आता

ज्यास जे उद्याला भरायाचे
तेच बापुडा करत तो आता

वाहिले घडे फ़ार पापाचे
नारदास मी भेटतो आता

उमेश वैद्य २०१२

गुलमोहर: 

शैली जगावयाची माझी तुझी निराळी!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 May, 2012 - 02:11

गझल
शैली जगावयाची माझी तुझी निराळी!
दिसती झळाच तुजला, मजला दिसे झळाळी!!

कवितेस लाभलेली कांती दिसून येते;
हृदयात आग जितकी, तितकी तिची झळाळी!

माझ्यामधून ऎसे खुडले तिने मला की,
हातात हात नव्हता; होती जणू डहाळी!

अंधार दूर इथला करतील लोक ऎसा,
कोणी करेल होळी, कोणी तरी दिवाळी!

चिडचीड व्हायची ना माझी तुझ्याप्रमाणे;
तू सोसतोस अन् मी, स्वीकारतो टवाळी!

गेलो दिपून रात्री पाहून रोषणाई;
फसवेपणा कळाला मजला खरा सकाळी!

काळीज ओतले मी ओळीत एकएका;
बहरेल रोज माझ्या गझलेतली नव्हाळी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,

गुलमोहर: 

जमले कधीच नाही

Submitted by निशिकांत on 15 May, 2012 - 00:51

मजला फुलावयाला जमले कधीच नाही
चुरगाळले कळीला सजले कधीच नाही

पदरास शुभ्र माझ्या दिधला कलंक ज्यांनी
लुटले मला असे की हसले कधीच नाही

उदरात माउलीच्या ठरवून वार केले
बिनजन्मताच सरले उडले कधीच नाही

मज घातल्यात बेड्या इतक्या परंपरेच्या !
कुजले, थकून गेले उडले कधीच नाही

वनवास भोगणार्‍या सीतेवरीच शंका !
पुरुषोत्तमा मना हे पटले कधीच नाही

म्हणतात देव धावे मदतीस भाविकांच्या
निघते कशास दिंडी? कळले कधीच नाही

चटके दिलेस देवा म्हणते मनी तरी मी
"ऋण ईश्वरा तुझे रे फिटले कधीच नाही"

असता जिवंत, माझ्या कबरीस खोदले मी
दुसर्‍यास त्रास देणे रुचले कधीच नाही

गुलमोहर: 

सुप्तनाते

Submitted by अभय आर्वीकर on 14 May, 2012 - 13:19

सुप्तनाते

तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना

तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना

चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा

गुलमोहर: 

दु:ख आता फार झाले (तरही)

Submitted by इस्रो on 14 May, 2012 - 08:11

हाय मी बेजार झाले
दु:ख आता फार झाले

सोबती ना सोयरे मज
आज मी लाचार झाले

बोलला येथे खरे जो
त्यावरी मग वार झाले

व्हायचे ते होत गेले
मीच मज आधार झाले

भेट झाली एकदाची
स्वप्न मम साकार झाले

बोलला तो काय ऐसे ?
ते असे गपगार झाले

उमजला गजलेस 'नाहिद'
शब्द आता यार झाले

--नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]
[इ-संपर्क : nahidnalband@gmail.com]

गुलमोहर: 

काल पुन्हा

Submitted by वैभव फाटक on 14 May, 2012 - 04:05

काळजातल्या विझलेल्या ज्वाळा धगधगल्या काल पुन्हा
हसता हसता क्षणात झाले रडून ओले गाल पुन्हा

मनी ठरवतो 'विचार आता पक्का झाला कायमचा'
क्षणात येते अन चुकचुकते का शंकेची पाल पुन्हा ?

माणूस आणिक श्वान सारखे, वाटे 'तुम्हास' पाहुनिया
आज बदडले तरी उद्याला शेपुट हलवत याल पुन्हा..

गेल्या वर्षापासुन होता 'कर्तव्याचा' बेत मनी
पण पोहे खाण्यातच गेले निघून अख्खे साल पुन्हा

तुझ्यासंगती आळवले मी जीवनगाणे प्रेमाचे
तू गेल्यावर चुकले सारे आयुष्याचे ताल पुन्हा

भालावरची रेष सुखाची बहुधा पुसली गेलेली
एक विनंती तुला, "लिहावे, देवा माझे भाल पुन्हा"

गुलमोहर: 

ती समोर येता माझ्या काळजात धडधड होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 May, 2012 - 04:00

गझल
ती समोर येता माझ्या काळजात धडधड होते!
नि:शब्द पार मी होतो, शब्दांची परवड होते!!

मी रोज नव्या स्वप्नांचे प्रासाद बांधतो आता;
होतात पूर्णही काही, काहींची पडझड होते!

सोबतीस माझ्या होते आभास तिच्या येण्याचे;
एरव्ही एवढे मजला जगणेही अवघड होते!

माझ्याच सुखाला माझा सहवास सोसला नाही;
बहुतेक बोलणे माझे थोडेसे परखड होते!

घमघमाट हा कोणाचा? हा कुठून आला वारा?
फिरफिरून का हृदयाच्या पानांची फडफड होते?

केव्हाच टाकले होते मी सराइतांना मागे;
खांद्यावर एकेकाच्या कीर्तीचे जोखड होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,

गुलमोहर: 

दूर कसा मी आलो इतका समजत नाही

Submitted by सतीश देवपूरकर on 13 May, 2012 - 04:27

गझल
दूर कसा मी आलो इतका समजत नाही;
तुझी आठवण सुध्दा येथे फिरकत नाही!

हात तुझा सुटला अन् दोघे जागे झालो;
पहा तुलाही मी नसलो की, करमत नाही!

पाय असे दे, तुझ्याकडे नेतील मला जे;
नकोस देवू पंख हवे तर, हरकत नाही!

रक्ताचे पाणी केल्यावर मला समजले.....
रक्ताला पाण्याइतकीही किंमत नाही!!

सूट कशाला मृत्यूच्या वेदनेत मागू?
जगताना मी कधी घेतली सवलत नाही!

सोपे नाही टिकणे पेशामधे आमुच्या;
मिळतो मोठेपणा परंतू, मिळकत नाही!

गुलमोहर: 

का म्हणू थांबेल कोणी? लोकही व्यापात होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 May, 2012 - 11:17

गझल
का म्हणू थांबेल कोणी? लोकही व्यापात होते!
हात देणे, वा न देणे; ते तुझ्या हातात होते!!

या जगाला फक्त दिसले ताटवे माझ्या फुलांचे;
बोचणारे सर्व काटे माझिया हृदयात होते!

मोकळा तू, मोकळा मी, मोकळे मैदान आहे!
कोण आता जिंकतो; पाहू कुणाची मात होते!!

जिंकले श्रोत्यांस सा-या गायला बसताच त्याने;
काय त्याच्या नेमके पहिल्याच आलापात होते?

सावली होवून ज्याने साथही आजन्म केली,
कोण तो? मी कोण त्याचा; ते मला अज्ञात होते!

याच लाटांना विचारा....जन्मलो मी गात गाणे;
मी बुडालो त्या क्षणीही ओठ माझे गात होते!

काल हातोहात त्यांनी लाटली स्वप्नेच माझी;

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल