काहीच्या काही कविता

वनाचा वनवास

Submitted by पल्लवी on 20 October, 2008 - 04:28

वन ओसाड ओसाड.. तिथं कुणीबी फिरकना
किती हाकारा हाकारा... तेचा वनवा विझंना..

असं कसं रे झालं हे वन वनवासी
ऐके काळी होते सारे इथले निवासी

वना आता सांग कसं वाटतं तुझ्या मना
तवाच्या वाटसरुंनी उड्या मारल्या टणा-टणा

वाडा

Submitted by पेशवा on 17 September, 2008 - 04:33

जुन्या वाड्यांच्या दारावरील
सायकलिंच्या ढिगासारखे
एकात एक गुंतून पडलेले विचार
घेउन बसलो आहे...

अर्गोनोमिक साहित्य
लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या
'मान द्या (नाहितर कापून घेइन)'
अशा जाड अक्षरानी पार वाकलेल्या

दूरवरुनी ह्रदयात शिरुनी......

Submitted by nikhil_jv on 10 September, 2008 - 05:33

दूरवरुनी, ह्रदयात शिरुनी
प्रेम कोठे असते कोणी पाहिलेय का?
अथवा ह्रदयाचे ऐकुनी बोल
कोण्या तरुणीस प्रेम आपले वाहिलेय का?

हो! मी पाहिलेय, हो! मी वाहिलेय,
असते प्रेम ह्रदयाच्या ठोक्यात
कधी पानांत, कधी फुलांत
कधी असते वार्‍याच्या झोक्यात

म्हणजे कोण्या सुंदरीस पाहुन
ह्रदय आपले धडधडते
इशारा असतो तो
तिच्या मिलनासाठीच ते तडफडते

भुक नाही, तहान नाही
काय होते आपली दशा
एवढ्यात तिचे 'हो' म्हणणे
प्रफुल्लित करते आपली आशा

तिच्या सानिद्यात राहुन राहुन
जीवन आपले फुलु लागते
ती नसताना तिच्या आठवणीत
मन वार्‍यासोबत डोलु लागते

मिळतो मग जगण्याचा मार्ग खरा,

डाग

Submitted by pradip rane on 7 September, 2008 - 10:50

मनं जुळली नसली तरी
हातात हात आहे,
सत्तेसाठी युती करताना
विरोधकांवर मात आहे.

खुर्चीच्या हव्यासापोटी
स्वाभिमान लाचार आहे,
श्रद्धांजलीच्या भाषणातही
पक्षाचा प्रचार आहे.

सभ्यतेच्या बुरख्याआड
सारे काही माफ आहे,

प्रपोज

Submitted by arunakishan on 2 September, 2008 - 15:31

"तुझ्या सोबत जगायचं हे माझं सुख आहे
तुझ्या शिवाय जगायचं हे माझं दुःख आहे
तुझ्या मध्येच माझं सुख-दुःख सामावल आहे
तु माझ्यावर प्रेम करण हे माझं जीवन आहे
मी एकतर्फी प्रेम करणं हे माझं मरण आहे"

प्रेम करणं ही माझी पहिलीच वेळ आहे

तार्‍यांचा प्रश्न

Submitted by nikhil_jv on 1 September, 2008 - 08:31

गगनातील तार्‍यांना देखील प्रश्न पडला असावा?
याच्यासारखा एकटक बघणारा आपला दुसरा मित्र नसावा

त्यांना काय ठाऊक? मी गगनात शोधतोय कोणाचे रुप
आणि तिला मिळविण्यासाठी प्रयत्न देखील करतोय खुप

जगा आणि जगु द्या.

Submitted by सुरेश पाटील on 29 August, 2008 - 00:09

एकदा एक वाघोबा विलायतेला गेले.
बॅरिस्टर होऊन परत आले.
परत येताच विचार करु लागले जात भाईन्चा,
मानवाच्या आत्याचाराचा, आणि आपल्या असाह्यतेचा.
काढ्ले फर्मान वाघोबानि सभेला यावे सर्वानि.

बाप्पा!!

Submitted by sanketdeshpande on 27 August, 2008 - 03:43

ही माझी कवीता नाही....पन रहावल नाही म्हणुन इथे पोश्ट करत आहे. शेवट पर्यन्त वाचावे.
--------
इथे फक्त स्वत:च्या कविता लिहाव्यात.
- मोडरेटर

निशा

Submitted by nikhil_jv on 14 August, 2008 - 06:32

पृथ्वीला विश्रांतीसाठी नभ पांघरतो शाल
नव्हे, तर तिला मिठीत घेण्यासाठी पसरवितो मायाजाल

या मायाजालात पृथ्वी खुळी फसते
निर्माण होणार्‍या अंधारावर रुसुनच बसते

पृथ्वी, नभाच्या लपंडावाने आकाशी तारे दिसु लागतात

Love At First Sight....!!!

Submitted by सत्यजित on 13 August, 2008 - 04:30

तुला पाहताच वाटलं मला
तुला पुर्वी आहे पाहिलं
आवरलेल मन माझं
बांध फोडून वाहिलं
कोण होतीस तू? आणि
कधी होती भेटलीस?
direct छातीत शिरत
थेट ह्रुदयालाच खेटलीस
किती घट्ट आवळलस?
तू माझ्या ह्रुदयाला...
नसानसा धवलं रक्त

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता