काहीच्या काही कविता

ओल

Submitted by पल्ली on 8 January, 2009 - 03:16

पाऊस तिच्या दारी आला
त्या पावसात ती ओलिचिंब भिजते.
पाऊस म्हणतो, मला तु का येऊ देते?
त्यावर ती गारठते!
पावसाला कविता सुचते,
तिच्या घरांत शब्द गळु लागतात,
त्याच शब्दांचा बर्फ ती फ्रिजमध्ये ठेवते,
तो घरी आला की

पोपट

Submitted by mitthu on 7 January, 2009 - 06:40

तिची माझी भेट अशी आचानकच घडली
पडत होता पाऊस होती छत्री खाली द्डली

तेवढ्यात कुठून एक वीज आशी कडाडली
सुंदर अशी काया तिची हळूच शहारली

तिच्या सुंदर चेहरया वरून ओघळत होते पाणी
पहात आहेत तिलाच सारे आलं माझ्या ध्यानी

एक तरी मैत्रीण असावी

Submitted by ShantanuG on 7 January, 2009 - 05:50
  • एक तरी मैत्रीण असावी
  • बाईकवर मागे बसावी
  • जुनी हीरो होंडा सुद्धा मग
  • करिझ्माहून झकास दिसावी !
  • एक तरी मैत्रीण असावी
  • चारचौघीत उठून दिसावी
  • बोलली नाही तरी निदान
  • समोर बघून गोड हसावी !

तुमचे स्वागत आहे...

Submitted by avi.appa on 6 January, 2009 - 01:32

तुमचे स्वागत आहे....
खरच, वय काय असते?
एक नंबर, १८-२०-४० वर्षे..
मग त्यावरुन ठरते
सज्ञान कि अज्ञान
मतदान केंव्हा करायचे.
लग्नास वय योग्य कि अयोग्य?
मरायच वय किति....
वेळ..एक भ्रम
आमच्या कडे बघा..
आम्हाला कुठलेच नियम लागु नाहित...

देवा मला लवकर...

Submitted by mitthu on 6 January, 2009 - 00:53

देवा मला रोज एक अपघात कर च्या धर्तिवर.....

देवा मला लवकर project allot कर
देवा मला लवकर project allot कर

दिवस आहेत recession चे
bench वर नको भर
देवा मला लवकर...

उद्या पर्वा कुठे तरी व्हावी एक Deal
नावावरती त्यातच माझ्या लागावे रे Seal
manager नी येऊन मला सांगावे तडक

सुदिनही नक्की येती..

Submitted by अलका_काटदरे on 31 December, 2008 - 10:07

(अशी पाखरे येती च्या धरतीवर..)

अशी संकटे येती आणिक धडे देऊनी जाती
दोन जगांची जुगलबंदी, चार दिसांची धास्ती

नाही जात, नाही धर्म, नाही त्यांना प्रांत
वेळी अवेळी अचानक टपकती ,नाही कसली भिती

एकजूट असे त्यांची, पाठोपाठ ऊभी ठाकती

पाहिजे आहे तसे मग.....

Submitted by mitthu on 31 December, 2008 - 04:18

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या "पाहिजे आहे तसे..." या गझल चे विडंबन केले आहे
सर्व जणांची माफी मागुन सादर करतो आहे

पाहिजे आहे तेव्हा गं तु मला सोडून जा
खर्च केला जो तुझ्यावर तो मला देऊन जा

एटीम होतो तुझा मी खर्च ते विसरू नकोस

क्रेडीट कार्ड

Submitted by mitthu on 30 December, 2008 - 07:07

रीसेशन चे दिवस होते जगणे होते हार्ड
त्यातच तीचा फोन आला घेता का हो कार्ड

तिच्या गोड बोलण्यात मी आसा काही फसलो
नको नको म्हण्ता म्हण्ता हो म्हणुन बसलो

मग काय तीने लगेच घेतला माझा पत्ता
वटलं होत स्वता: येईल पाठवुन दिला पोट्टा

कवीरायाचं अंगाईगीत

Submitted by मृण्मयी on 12 December, 2008 - 14:23

बाळा कवीराया
जोजवीते
गाणे तुजला गाते
बाळा कवीराया ||धृ||

प्रतिभाशाली तू
अती जबरा
तव शब्द मोहवीती सकला
बाळा कवीराया ||१||

कडबोळ्या वळुनी
कवितांच्या
खाऊ घालीसी विकला
बाळा कविराया ||२||

शब्दांची सरिता
वाहवुनी

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता