तार्‍यांचा प्रश्न

Submitted by nikhil_jv on 1 September, 2008 - 08:31

गगनातील तार्‍यांना देखील प्रश्न पडला असावा?
याच्यासारखा एकटक बघणारा आपला दुसरा मित्र नसावा

त्यांना काय ठाऊक? मी गगनात शोधतोय कोणाचे रुप
आणि तिला मिळविण्यासाठी प्रयत्न देखील करतोय खुप

पण तार्‍यांआड लपलेला तो चेहरा समोर मात्र येत नाही
अधुर्‍या या माझ्या शब्दांस पूर्णत्वास कधी नेत नाही

याचा अर्थ असा नव्हे ती द्रुष्टीस कधी पडत नाही
पण ठराविक वेळेआधी दर्शनच तिचे घडत नाही

म्हणजे असंख्य तार्‍यांमधुन जेव्हा चंद्र ठेवतो पाऊल
तेव्हाच तिच्या आगमनाची मनाला लागते चाहुल

म्हणुनच रोज रात्री आकाशात बघण्याचा मला छंद जडतो
पण माझ्या या एकटक बघण्याचा तार्‍यांना का प्रश्न पडतो?

निखिल, छान आहे कविता....

ही 'ती' कोण बरे, जी थेट चंद्रावरुन इथे अवतिर्ण होते??

कवितेत दृष्टी......dRuShTI असा लिहा. बाकी आपल्याला ते छंद, वृत्ते, मात्रा वगैरे प्रकार कळत नाहीत..

साधना.

कविता छान आहे. कोण रे "ती"?

निखिल सहीच रे कविता.. आता प्रश्न आम्हाला पडलाय.. कोण रे "ती"?..