Submitted by arunakishan on 2 September, 2008 - 15:31
"तुझ्या सोबत जगायचं हे माझं सुख आहे
तुझ्या शिवाय जगायचं हे माझं दुःख आहे
तुझ्या मध्येच माझं सुख-दुःख सामावल आहे
तु माझ्यावर प्रेम करण हे माझं जीवन आहे
मी एकतर्फी प्रेम करणं हे माझं मरण आहे"
प्रेम करणं ही माझी पहिलीच वेळ आहे
तुला प्रपोज करणं हा मोठ्ठाच खेळ आहे
खेळामध्ये उतरलो आहे मी
डाव तु अर्धा सोडू नकोस
प्रेम करत नाही तुझ्यावर
असं चुकून सुध्दा बोलु नकोस
प्रेमाचं गणित वेगळ मला काही सुटत नाही
इतका का मरतो तुझ्यावर मला काही कळत नाही
एकदा तरी म्हण आता की माझ तुझ्यावर प्रेम आहे
नाही तर मी ही कविता तुझ्या मैत्रीणीला देत आहे
अरुणकिशन (राहुल रणसुभे)
गुलमोहर:
शेअर करा
एकदा तरी म्हण आता की माझ
एकदा तरी म्हण आता की माझ तुझ्यावर प्रेम आहे
नाही तर मी ही कविता तुझ्या मैत्रीणीला देत आहे>>>
तब्बल एका तपानंतर !
तब्बल एका तपानंतर !
लेटेस्ट स्टेटस काय आहे?
नाही तर मी ही कविता तुझ्या
नाही तर मी ही कविता तुझ्या मैत्रीणीला देत आहे>> हा स्पष्टवक्तेपणा आवडला. उगाच कशाला झुरत बसायचं.
कवी पर्यावरणप्रेमी आहे
कवी पर्यावरणप्रेमी आहे
कवितेचा कागद फुकट नाही गेला पाहिजे
भारीए कविता
भारीए कविता
कविता कागदावर लिहिलेली असणं
कविता कागदावर लिहिलेली असणं गरजेचं नाही. कवी पर्यावरणप्रेमी नसू शकतो.
कविता कागदावर न लिहिणे हे तर
कविता कागदावर न लिहिणे हे तर आणखीनच छान की. पर्यावरणप्रेमी हेच करतात. कागद वाया घालवत नाही. प्रिंट घेत नाही.
झाडावर प्रेम करा. झाडाखाली नको. ते ऑनलाईन करा.
कवी पर्यावरणप्रेमी आहेत की
कवी पर्यावरणप्रेमी आहेत की नाही यापेक्षा त्यांनी कवितेला शेवटच्या कडव्यात जे वळण दिलेय महत्वाचे आहे. पुढील कविता लवकर येऊ द्या.
कवितेतला स्पष्टवक्तेपणा आवडला
कवितेतला स्पष्टवक्तेपणा आवडला...
कवी पर्यावरणप्रेमी आहेत की
कवी पर्यावरणप्रेमी आहेत की नाही यापेक्षा त्यांनी कवितेला शेवटच्या कडव्यात जे वळण दिलेय महत्वाचे आहे.
>>>>>
कविता २००८ ची आहे हे पाहता तेव्हा ते वळण जास्त महत्वाचे असू शकेल.
पण सध्या तरी सर्व कवींनी पर्यावरणप्रेमी बनणे जास्त महत्वाचे झालेय