काहीच्या काही कविता

जुल्मी डोळे

Submitted by aaftaab on 11 July, 2008 - 03:17

मी जेव्हा तुझ्या डोळ्यात पाहिलं..
तेव्हा मला तुझ्या डोळ्यातलं माझंच प्रतिबिंब दिसलं..
मग आणखी खोल जाऊन पाहिलं,
तर माझ्या प्रतिबिंबाच्या डोळ्यात मी डोळे घालून पाहू लागलो.
एकटक, अनिमिष..
काही क्षणानंतर लक्षात आलं, की

आपलाच बोन्साय !!

Submitted by manya_joshi on 21 June, 2008 - 10:27

ग्लोबलायझेशनच्या नादात
जग झाले छोटे,
माणसं लाख जवळ आली
पण माणूसकी कोठे ?

SMS, Email च्या वापरात
शब्द झाले छोटे,
भावना लाख मनी दाटल्या
व्यक्त कराल कोठे ?

फास्टफूडच्या जमान्यात
फूड झाले छोटे,
पोट लाख भरत असेल
त्यात सत्व कोठे ?

रद्दी

Submitted by चिन्नु on 19 May, 2008 - 21:31

खूप दिवसांपासून म्हणत होते...
रद्दी काढलीच शेवटी काल.

गिचमीड अक्षरे,
दूरवर अडखळत चालणार्‍या वाटा,
रांगोळीचे रंग,
गंधहीन पाकळ्या
-बरंच काही होतं साठून..

मनात कोरलेली अक्षरे पुरे झालीत

अर्धवट कविता...कृपया पूर्ण कराल का????????

Submitted by uttekar.mangesh on 13 May, 2008 - 07:42

माझे हे शब्द, ईथेच तुझ्या वाटेवर सांडले आहेत......
त्यात तुझ्या -माझ्या बद्दलचे विचार मांडले आहेत......

कधि तरी त्या वाटेला जाशिल, म्हणून तिथे चौकिदाराला बसविल आहे.
मला तरी कुठे कल्पना होति कि, माझ्या नशिबाने मला फसविल आहे.

ऑनलाइन

Submitted by soni_kudi on 18 April, 2008 - 01:31

तुझं सांभाळुन बोलणं
मर्याद्शील वागणं
किति राग आला तरि
मुळिच नाहि तोडणं

तुझि प्रत्येक गोष्ट
मला भुलवत गेलि
अशि तुझि माझि
मैत्रि खास झालि

मग सुरु झाले
वाट बघायचे तास
ऑनलाइन नाहिस म्ह् णुन
डोक्याला त्रास

मग तुझा मेसेज

प्रश्न उत्तर

Submitted by nikhilmkhaire on 22 March, 2008 - 07:42

प्रश्न प्रश्न...
उत्तर उत्तर...
सखे अगं केवढीशी ती तू
अन् त्याहून केवढासा तो मी.

आभाळ निळे का उतरावे जळी
नी का फुलते कळी?
माझी गाडी इथेच अडली
अन् तू मात्र...

प्रश्न प्रश्न...
उत्तर उत्तर...
सखे अगं केवढीशी ती तू

एक विडम्बन

Submitted by mitthu on 12 March, 2008 - 03:20

दिवस आहेत गर्मिचे अन घरी पहा लाईट नाही
आज माझ्या बाळाला झोप काही येत नाही
वारा घालून दुखले हात
घरी दूसरा कोणी नही
ऐमेसीबी रुसली आज
बाहेरही वारा नाही
मीट पापण्या डोळ्यांच्या
हाती माझ्या त्राण नाही

’येते हं’

Submitted by सत्यजित on 6 March, 2008 - 07:27

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे!
नाहीच भरल हातानी मन तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झालं
तुझ्या भाळी आठ्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तू 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं

लोच्या झाला रे...

Submitted by सत्यजित on 28 January, 2008 - 04:18

पेरूच्या फ़ांदीवर बसुन देखील
पोपट उपाशी
सारे पेरू खाउन गेले
कावळे मघाशी

पोपट म्हणतो. . .

आह हा हा ! पेरूच खरा
पेरूच्या पानालादेखील काय स्वाद आहे
हे साले कावळे म्हणजे
जन्माची ब्याद आहेत !

कावळे म्हणतात. . .

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता