आरसा

Submitted by परागकण on 10 February, 2008 - 15:24

घरातली ही खोली, माझी
मीच निवडलेली
जराशी आडबाजूची
बरीचशी अडगळीची
श्वास खोलावणार्या अंधाराची ...

डोकवायचंच असेल आत तर
ढकलावा लागेल तुम्हालाच दरवाजा स्वतःच्या जोखमीवर.
एक हलकीशीच, पण निश्चयी फुंकरही पुरेल
कडीकोंड्याविना दरवाजा अगदी सताड उघडेल.

अन आत काय दिसेल?

जुनाट चिवट भिंतींच्या आधाराने तगलेली अडगळ
आणि जमिनीवर मधोमध एक चकचकीत आरसा,
पूर्व-पश्चिम दोनच झरोके,
त्यातून सहजपणे खोलीत घुसणारे स्वप्नाळू परंतु तेजस कवडसे -
एक अंधार उजळणारा
दुसरा अंधार ठसविणारा ...
आणि आरशाची अखंड धडपड, ते कवडसे झेलण्याची
पेलण्याची, शोषून घेण्याची
आणि स्वत: कवडसा बनण्याची ....

विशेष सूचना:
कृपया दाराबाहेरच्या disclaimer वर सही करायला विसरू नका -
"मी स्वतःच्या जोखमीवर हा दरवाजा उघडत आहे.
फुंकर मारण्यापूर्वी मी पुनःपुन्हा विचार केला आहे."

गुलमोहर: 

पूर्व-पश्चिम दोनच झरोके,
त्यातून सहजपणे खोलीत घुसणारे स्वप्नाळू परंतु तेजस कवडसे -
एक अंधार उजळणारा
दुसरा अंधार ठसविणारा ...

ये हुई ना बात...

पीके... मै शायर बदनाम.... पीके ने बोहोत दिनोबाद कुछ पिके लिखा है... क्युं? बोहोत खुब मेरे दोस्त..

आरसा ही कविता वाचून मला माझी एक जुनी कविता आठवली:

शेवटचं पान कोरं

शेवटचं पान कोरं
प्रत्येक वहीच्या अंती
मी हळूच दुमडुन घेतो
आतच अपुल्या खंती

किति दूर कुठे फुलते ती
ती नील किनारी कलिका
द्रुष्टी पण माझी नाही
नाही पोचत तिथवर का?

या दुष्ट मनाच्या काठी
मी असेन हतबल बसला
किंवा माझ्या हातांनी
आव़ळला, फासा कसला...

एक हलकीशीच, पण निश्चयी फुंकरही पुरेल
कडीकोंड्याविना दरवाजा अगदी सताड उघडेल

पीके, खूप छान आहे कविता.

एक हलकीशीच, पण निश्चयी फुंकरही पुरेल
कडीकोंड्याविना दरवाजा अगदी सताड उघडेल.

>>> क्या बात है !