कविता
शब्दांचे मनोरे जोडले जातात-
मालगाडीच्या लांबच्या लांब रांगेगत
यमकाला यमक जुळवले जाते
ओढून तानून निरनिराळे शब्द खेचल्यागत
कविता मनी कधी स्फुरते
कधी-कधी नाद मनी घुमवते
कधी-कधी शब्दांच्या आडोश्याला लपते
शब्दांचे मनोरे जोडले जातात-
मालगाडीच्या लांबच्या लांब रांगेगत
यमकाला यमक जुळवले जाते
ओढून तानून निरनिराळे शब्द खेचल्यागत
कविता मनी कधी स्फुरते
कधी-कधी नाद मनी घुमवते
कधी-कधी शब्दांच्या आडोश्याला लपते
जसे नादति सूर सुखाचे
दु:खाचीही किणकिण असते
असेच स्मरतां तुझे हांसणे
सुखदु:खाची सीमा विरते
चुंबूनी घेता तुझी कुंतले
ओठांवरती धुसफूस दिसते
मजला ठाऊक त्यांची खोडी
कशाकशाची भ्रांत न उरते
कसे सोडवू या हृदयाला
आता मी सहसा दु:खी होत नसावी
अमुर्ताच्या पाठलागाचं त्राणंच उरलेलं नसणार.....
मात्र रानात पाचोळा साठत जावा
झाडाच्या बुंध्याशी
आणि सरसरत रहावं काही
पाचोळ्यातुन
तसंच काहिसं वाजत असतं
मनाच्या तळाशी अधुनमधून .....
तु गुलाब गुलाब, मी मोगरा मोगरा
या प्रेमात रे सारा आसमंत बहरला
हा सुवास सुवास, तुझ्या प्रेमाचा रे ध्यास
लाभो जन्मभर तुझा तुझा, तुझाच सहवास
चंद्र तारयांनी रे सारे, हे आकाश सजले
चिंब पावसाने सारे, हे रानही भिजले
१९ फेब्रुवारी १६३० साली,
जागा होती किल्ला शिवनेरी
जन्म झाला एका महापुरुषाचा...
जो बदलणार होता इतिहास भारताचा
त्या महापुरुषाला प्रिय होती त्याची
मराठी मायभूमी..
त्या महापुरुषाचे नाव होते श्री छत्रपती शिवाजी महाराज...
फेर धरुनी थकले रे
किती करु तुझा धावा
रविवर्या तुझ्या असुयेतच
वसुधेचा जन्म जावा
नदीलाटा झुळझुळती
गात निसर्गाचे गीत
धावते अनामीक ओढीने
मनी रत्नाकराची प्रित
कधीचा चातक तहानलेला
तरिही अंतर देउन पाण्यास
सरीत पहील्या श्रावणाच्या
चिंब भिजुन जाण्यास
अशीच दैवी प्रित ही
अवतरली आपुल्या मनी ?
नदी,वसुधा,चातक तर
रत्नाकर,रवी,श्रावण कुणी.
आभाळ दाटुनी उरले
काळेले घन अपराधी
पोटात कोंडले जीवन
भास्करास केले बंदी
पेटते दूरवर कोठे
सौदामिनिची रेखा
देण्यास भोवतालीच्या
तिमिराचा जणु की जोखा
एकटाच कोणी पक्षी
भिरभिरतो आवर्तांत
शोधतो थव्यास चुकल्या
परवा मला चेहरा दिसला, ओळ्खीचा म्हणून नमस्कार केला,
वर्षानंतर कळाल तो माझ्या शेजारचा फ्लॅटवाला निघाला
त्याच्या पोराने त्याला डॅडी म्हणून हाक मारल्याने
त्याला मी 'हाऊ आर यु' असा सवाल केला
हि रात्र नाहलेलि प्रनयात आसवाच्या ||ध्रु||
डोळ्यास लागलेलि ओड त्या रुपाची
शरिरास लागलेलि ओड त्या सुखाची
वेदना उरी या आज गोड भावनाच्या..... ||ध्रु||
स्पार्शात लाजनारा उत्कनठ हा प्रितिचा
शब्दात काय मावे भाव या ऊरीचा