निस्तब्ध झाडाची ओली सावली
माझ्या मनात घर करून राहिली
ती आली आणि निघून गेली
रान माझे ओले माझ्या सांगाती....
क्षितिजावर तरंगणारी एकटी होडी
वादळातही वाट सांभाळत राहिली
ती आली आणि निघून गेली
सागरास माझ्या उधाणलेला सोडूनी....
डोळ्यांत दाटली स्वप्ने एका चाहुलीची
एक खिडकी राहून गेली सताड उघडी
ती आली आणि निघून गेली
दारी माझ्या एक जळता दिवा ठेवुनी....
पावलांची एक ओळ मातीवर उमटुन गेली
पहिल्या पावसाचा गंध वाटेला देऊन गेली
ती आली आणि निघून गेली
वळणावर माझ्या, तिचा भास सोडूनी....
-शंतनु
न पेतविलेली चुल विझवत व रहिलेल्या आसवात पदर भिजवत माय बाब्याला गोन्जारीत होती अन् आसव पिउन दिस काधायाच हलुहलु शिकवित होती...
मन बगळ्यांची माळ, निळ्या नभाच्या प्रांगणी..
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी..
मन इवलेसे फूल, नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..
मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
आज तीच्या डोळ्यात माझा स्वर्ग आहे शोधला
पाहताचि वाटले जणु मोक्ष मजला लाभला |
हळू तीने ओठातुनी मज आम्रत घोट पाजला
पाहूनि ऍश्वर्य माझे चन्द्र नभीचा लाजला........||
माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या वडलांची रद्दी…
विडीकाडीपुरता सुटतो रुपया कधी कधी…
माझी प्रेमपत्रं म्हणजे तिच्या आईला टेंशन…
आमच्या वेळी असलं नव्हतं, काय हे नेक्स्ट जनरेशन…
माझ्या प्रेमपत्रांवर मग आजोबांचा नंबर
एका छायाचित्रकाराचे मनोगत टिपण्याचा एक प्रयत्न...
निर्मात्याने निर्मिलेली प्रत्येक गोष्ट आत्मियतेने पहाणारा मी
कुणी म्हाणतं ढोंग आहे
कुणी म्हाणतं व्यासंग आहे
कुणी म्हाणतं कुतुहला पोटी सारं
आज हवेत एक आगळाच
धुंद सुगंध आहे
कोणीतरी खास भेटावं
ही अपेक्षा बेबंद आहे
फांदीचा एकटेपणा
नविन पालवी दूर करेल
निर्विकार पाचोळा मात्र
मुळाशी जमिनीत मिसळेल.
आजही घराचं कवाड दृष्टीपथात नाही
रंग-गंधांच्या पाऊलखुणा वागवत
अजून किती फुलत फिरायचं.... ह्या ऋतूतून त्या ऋतूत
सत-चित संभाळत आनंदाच्या शोधात...
आजही घराचं कवाड दृष्टीपथात नाही
-- शलाका
ग्रीष्म सरला, वसंत आला
गुलमोहराला फारच मोठा बहर आला ||धृ||
(च्यायला यमक जुळ'ला'???)
इकडे कविता खूप गोड लाजली
तिचा पाय जड झाला
मग एकेदिवशी तिनी
लाखो शब्दांना जन्म दिला ||१||