Submitted by shriramb on 22 March, 2008 - 03:36
आभाळ दाटुनी उरले
काळेले घन अपराधी
पोटात कोंडले जीवन
भास्करास केले बंदी
पेटते दूरवर कोठे
सौदामिनिची रेखा
देण्यास भोवतालीच्या
तिमिराचा जणु की जोखा
एकटाच कोणी पक्षी
भिरभिरतो आवर्तांत
शोधतो थव्यास चुकल्या
त्या अथांग आकाशात
खिडकीतुन माझ्या इवल्या
ही सांज अनाहत येते
मुके सूर अस्मानाचे
कंठात घुमवुनी जाते
~श्रीराम
गुलमोहर:
शेअर करा
छान!
मळभ दाटल्या दिशा
दाटले मळभ मनी...
चांगलं
चांगलं मनस्वी लिहितोस. लिहीत रहा.