तुझी साथ हवी असतांना....

Submitted by Ambarish on 23 April, 2008 - 21:39

तुझी साथ हवी असतांना
मन कासावीस का होते
मन तुझीच कविता गाते
मन शब्द फुलांनी सजते...

ओल होउनी मी ओठांची,
कधी गाली होउनी लाली ..
तुझ्याच तनी मी वसून कधीचा
झालो तुझ्या हवाली,
मी वारा होउनी केस तुझे
भिरकावुन उडून जावे,
मी पाउस होउन रिमझिमणारा
तुज चिम्ब भिजवून जावे....

तुज हातावरची रेष मी
होउन नशीब उजळावे,
तुज पायांमधली पैजण होउनी
हुलुवारपणे नादावे..
मी रेशिमधागे होउन ओढ़नी
ह्रुदयाचे गीत ऐकावे,
होउन काजळ नयनान्मधाले
मी डोळ्यान्मधे रहावे...

मी नाही शिकलो प्रेम कधी
मी नाही शिकलो कविता
मी शिकलो तुला पहाणे
तुला बघता झाली कविता
स्वर गाण्याचा हळूच जुळला
जशी आपली प्रीत जुळावी
एक होउनी मने आपुली मग
प्रेमाची गाणी गावी....

----------------------------- अम्बरीष देशपांडे

गुलमोहर: 

सहज आहे... निरागस आहे... ओघ आहे.. छान आहे. अंबरीश, शेवटलं कडवं जास्तं आवडलं.