नेहमीप्रमाणे
हाती आलेल्या बातमीनुसार स्फोट स्फोट चहुवरी
अमुक ठार, तमुक जखमी, वेगवेगळी आकडेवारी
मागील पानावरुन पुढे, नव्या प्रवेशाचे गाडे
सुरक्षा, तपास, अटक, वरातीमागुन घोडे
शेजार्याचा नाही यात चिरीमिरीचा हात
हाती आलेल्या बातमीनुसार स्फोट स्फोट चहुवरी
अमुक ठार, तमुक जखमी, वेगवेगळी आकडेवारी
मागील पानावरुन पुढे, नव्या प्रवेशाचे गाडे
सुरक्षा, तपास, अटक, वरातीमागुन घोडे
शेजार्याचा नाही यात चिरीमिरीचा हात
झेलल्या आहेत जरी हजारों जखमा आजवर,
या वेदनेची नशा थोडी वेगळीच आहे....
काल जे समोर सत्य होते,
आजचे ते स्वप्न आहे.....
सांगितले जरी नसशील गुपित मनातले,
डोळ्यांनी दिलेली हाक अजून घुमतच आहे....
रंग मनीचे उधळले नसशील तरी,
कावरी बावरी नजर तु़झी,सांगून जाते काहीतरी..
कळत नाही मला कसे हे, होते असे हे कधीतरी..
अबोल सदा राहून तू , बोलून जातेस कधीतरी..
शब्द माझ्या ओठांवरचे,विरुन जाती हवेवरी.....
तू तर एक शापित परी,अन् मी भणंग भिकारी..
नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
बोल्घेव्डे तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे काजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
कोकिळा घेई तान
म्हणते मजला
प्रेम देव समान
हिरवे रान डोलते पान
म्हणते मजला
प्रेम देव समान
इन्द्रधनुचे रन्ग नवे
वाट्ति हवे हवे
म्हणते मजला
प्रेम देव समान
- देव
परवा कसं कोण जाणे माझ्याही घरी
पोस्टाने एक नोटांचं बंडल आलं
बंडल नाही मारत खरं सांगतोय
त्यावर माझ्या भुभुचं नाव लिहीलेलं
सरकार चालवायला सर्वपक्षीय आघाडीला
माझा भुभु हवा होता
खाल्ल्या पैशांना जागणारा
बहू शब्दांचा पसारा झाला,
मला भावना दिसेना........
शाब्दिक चकमक झडू लागली
मुल्ये तत्वे अडगळीत गेली
परंपरेला झट मुरड बसली
त्या शब्दांचा अर्थ शोधता,
मला भावना दिसेना........
संवेदनांचा दुष्काळ पसरला
रक्तरंजित सडाही वाहला
कॉलेजमध्ये असताना इकॉनोमिक्सच्या मॅडमने त्यांच्या शिकवण्याच्या हातोटीने प्रभावित केले होते. तेव्हा सहज खरडलेल्या या ओळी ...
रुंद रुंद देह त्यांचा, मंद मंद चाले
धरणीकंप वाटे मजला, जरा जरी हाले
गोल गोल काया अन
वाणी मर्मभेदी
भिंतीवरी रंगार्याने शेवटचा हात फिरवला
कैक कोरीव कलांवर पांढरा पडदा सारवला
चालता-चालता क्षणभर मी ही थबकलो
ओळ्खीच्या खुणाना नकळत शोधु लागलो
चुन्याआड कुठेतरी सार्या खुणा दडल्या होत्या
घन दाटता अंबरी, सर येई आठवांची
उठे लहर अंतरी, चिंब ओल्या जाणिवांची
आत कप्प्यात तळाशी
पाय दुमडुन उराशी
घेणे देणे ना कुणाशी
बोल बोलुनी स्वतःशी
सुप्त आठवणी, पडल्या निपचित
उचंबळुनी, येती अवचित
जैसी मृगाचिया धारा